.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Did Virat Kohli sign on Pakistan flag photo fact check : विराट कोहली पाकिस्तानच्या झेंड्यावर ऑटोग्राफ देत असतानाचा फोटो व्हायरल झालाय...या फोटोत चाहत्याला कोहली ऑटोग्राफ देतोय...पण, खरंच विराटने पाकच्या झेंड्यावर सही केलीय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
विराट कोहली बघा, पाकिस्ताच्या झेंड्यावर ऑटोग्राफ देतोय...पाकिस्तानी चाहत्याने विराटकडून सही घेत असतानाचा हा फोटो व्हायरल झालाय...त्यामुळे विराटवर जोरदार टीका होतेय...पण, खऱंच विराटने पाकिस्तानच्या झेंड्यावर ऑटोग्राफ दिलीय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...
हा फोटो नीट पाहा, विराटच्या चाहत्याच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे...यावेळी विराटला थांबवून त्याने झेंड्यावर ऑटोग्राफ घेतलीय...विराटही शांतपणे झेंड्यावर ऑटोग्राफ करत असल्याचं दिसतंय...पण, खरंच विराटने पाकिस्तानी चाहत्याला झेंड्यावर सही दिलीय का...? विराटने पाकिस्तानच्या झेंड्यावर सही का केली...? असे सवाल उपस्थित करून विराटवर जोरदार टीका केली जातेय...फोटोसोबत व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
विराट कोहलीने पर्थ येथे पाकिस्तानच्या झेंड्यावर ऑटोग्राफ दिला. चाहत्याची त्याने इच्छापूर्ती केली. काही दिवसांपूर्वी भारतीय टीमने पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासही नकार दिला होता...मग विराटने पाकिस्तानी झेंड्यावर सही कशी केली...त्यामुळे व्हायरल फोटोमागचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली...आम्ही काही विराटचे फोटो पाहिले...त्याचे सोशल मीडिया हँडल तपासून पाहिले...मात्र, पाकिस्तानच्या झेंड्यावर ऑटोग्राफ देतानाचा फोटो कुठेही सापडला नाही...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
साम इन्व्हिस्टिगेशन
विराटने पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ दिलेला नाही
विराट कोहलीचा व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा
विराटने चाहत्याला RCBच्या जर्सीवर ऑटोग्राफ दिला
खऱ्या फोटोशी छेडछाड करून पाकचा झेंडा दाखवला
विराट जेव्हा पाकिस्तानविरोधात खेळतो, तेव्हा सगळी ताकद पणाला लावतो...पाकिस्तानविरुद्ध त्याने अनेकदा चांगली खेळी केलीय...दोन वर्षांपूर्वी हातातून गेलेली मॅचही त्यांना एकट्याने खेळून जिंकून दाखवली...मात्र, विराटने पाकिस्तानच्या झेंड्यावर ऑटोग्राफ दिल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.