ST Buses : टेस्लावाल्या नेत्यांनो जरा एसटीकडेही लक्ष द्या, लाल परीची दयनीय अवस्था

ST Bus Crisis: महाराष्ट्राची लालपरी म्हणजेच एसटी बस आता अक्षरशः मोडकळीस आली आहे. पुणे जिल्ह्यात चालकाच्याच बाजूचा दरवाजा गायब, प्रवाशांचे हाल, तर मंत्री मात्र टेस्लाच्या कौतुकात मग्न आहेत.
transport minister
transport minister
Published On

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची म्हणजेच एसटीची अगदी दयनीय अवस्था आहे. प्रवाशांचे तर हाल होत आहेतच मात्र आता एसटी चालकही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय. पाहूया एक खास रिपोर्ट

ही एसटी पाहा....सुरक्षित प्रवासाची हमी असं घोषवाक्य असणाऱ्या राज्य परीवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना...पुणे जिल्हयातलं हे चित्र आहे. ओतुरवरुन नारायणगाव इथं जाणारी एसटी पिंपळवंडी गावात आली आहे. प्रवाश्यांना तर वाऱ्यावर सोडलंच आहे पण खुद्द चालकही राम भरोसे एसटी चालवतायेत. चालकाच्या बाजूचा दरवाजाच गायब झालाय. त्यामुळे ग्रामीण भागातला दिवाळीच्या सुट्टीतला एसटीचा प्रवास खरच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय. एसटी बस खिळखिळ्या होण्यामागे रस्त्यावरील खड्डे जबाबदार असल्याचं सांगत नारायणगाव आगार व्यवस्थापकांनी हात झटकलेत.

transport minister
Nashik : आता शत्रूची खैर नाही! नाशिकचं स्वदेशी तेजस, पाकिस्तानला धडकी

एसटीत कधी सीटच तुटलेली असते तर कधी खिडकी खिळखिळी झाले असते तर कधी छत गळकं असल्यानं पावसाचं पाणी थेट आत येत. अशा बसेस पुरवून एसटी प्रशासन अपघाताची वाट पाहतंय का? असा सवाल प्रवाशांनी केलाय.

transport minister
Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

जागोजागच्या खड्ड्यांनी एसटीचा कणा मोडला आहे. मात्र परीवहन मंत्री टेस्ला कंपनीच्या अलिशान कारच्या कौतुकात मग्न आहेत. मात्र एसटीच्या दुरावस्थेकडे त्याचं लक्ष नाही. ग्रामीण भागाच्या विकासात दळणवळण सेवा महत्वाची आहे. एसटी सक्षम असेल तर गावखेड्यातील जनतेलाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईतून कारभार हाकणाऱ्या नेत्यांनो जरा गावगाड्याच्या वाहतुकीचा महत्वाचा मार्ग असलेल्या या लालपरीकडे ही जरा लक्ष द्या

transport minister
Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com