Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

Gopichand Padalkar controversy : भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य केल्याने राजकीय वाद पेटला आहे. "मुलींनी जिममध्ये जाणं बंद करून घरात योगा करा" असं पडळकर म्हणाल्याने महिलांविषयीचा दृष्टिकोन चर्चेत आलाय.
 Gopichand Padalkar News
Gopichand PadalkarSaam Tv
Published On

BJP leader’s Gopichand Padalkar controversial statement on Hindu girls : राजकीय नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पडळकरांनी आता थेट हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य केलंय.. मात्र पडळकरांचं नेमकं वक्तव्य काय आहे? आणि त्याचे कसे तीव्र राजकीय पडसाद उमटलेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

हे आहे बाष्फळ आणि बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप आमदार गोपिचंद पडळकरांच्या तालिबानी मानसिकेचं वक्तव्य....त्यांनी थेट जीमला जाणाऱ्या मुलींनी जीम बंद करुन घरातच योगा करा, असं मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं वक्तव्य केलंय... एवढंच नाही तर ट्रेनरचा धर्म पाहून मुस्लीमांविरोधात धृवीकरणाचा नारा दिलाय...

 Gopichand Padalkar News
Local Body Election : जालन्याचा पहिला महापौर कोण? भाजप अन् शिंदेसेनाचा थेटच सामना; वाचा गोरंट्याल की खोतकर, कुणाचं पारडं जड

पडळकरांच्या या तालिबानी फतव्यासारख्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटलेत.. पडळकरांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही भाजपमधील चित्रविचित्र महिला शांत असल्याचा खोचक टोला लगावलाय..

खरंतर पडळकर आणि त्यांचं वादग्रस्त वक्तव्य हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.. कारण पडळकरांनी याआधीही सातत्याने पवार कुटुंबासोबतच जयंत पाटील यांच्यावरही पातळीहिन टीका केलीय..

 Gopichand Padalkar News
Pune : दौंडजवळच्या कला केंद्रात पुन्हा राडा, मनोरंजनासाठी आलेल्या दोन गटात कोयत्याने हाणामारी

रिपब्लिकन डाव्या आघाडीकडून राजकारणात आलेले पडळकर महादेव जानकरांच्या रासपमार्गे, वंचित आणि पुढे भाजपात गेले... आधी धनगर आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे पडळकर आता कट्टर हिंदूत्ववादी नेते झालेत... आता भुछत्राप्रमाणे उगवलेल्या नेत्यांकडून महिलांबद्दल तालिबानी मानसिकतेची वक्तव्य केले जात असतील आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर...आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊनही पडळकर त्याला दाद देत नसतील तर अशा नेत्यांना जनतेनंच मतपेटीतून धडा शिकवायला हवा.....

 Gopichand Padalkar News
पुन्हा अग्नितांडव! अलिशान गाडीला ट्रेलर धडकला, आगीत ४ मित्र जिवंत जळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com