अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
jalna municipal corporation election date 2025 : जालन्यात दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार आहे. पहिल्या महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्याबरोबर जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी सध्या महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीने अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. शहरात एकूण 16 प्रभाग असून पहिल्या निवडणुकीत महानपालिकेत 65 नगरसेवक निवडून जाणार आहेत. महापौर पदासाठी राज्यातील सत्ताधारी महायुती मधील भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होणार होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे दिवाळी गोड झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय फटाके फुटण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून प्रशासनाकडून निवडणूक आयोगाच्या परवानगीने महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली करण्यात आली आहे. यामध्ये जालना शहरात 16 प्रभाग तयार करण्यात आले असून नगरसेवकाची संख्या 65 वर जाणार आहे.
महानगरपालिकेची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून प्रशासनाकडून अंतिम प्रभाग रचना यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भावी नगरसेवक कामाला लागले आहेत. जालन्यात दिवाळीनंतर महापालिका निवडणुकीची आतषबाजी सुरू होणार असून फटाके देखील फुटणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली असून मागील काही महिन्यापासून शहराच्या राजकारणात मोठी उलथा पालत झाल्याने महापालिका निवडणुकीचे गणित बदलले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिट्टी देऊन माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची ताकद कमी झाली आहे तर भाजपला या निवडणुकीत बळ मिळाले आहे. त्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच होणार असल्याने दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू शकतात..
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. त्यामुळे जालना शहरांमध्ये निश्चितच काँग्रेसची ताकद कमी झाली असून भाजपला या पक्षप्रवेशामुळे बळ मिळाल आहे. तर काँग्रेसची ताकद कमी झाल्याने महाविकास आघाडीमध्ये शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वाधिक मजबूत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षामध्ये महापौर पदावर दावा होऊ शकतो. दिवाळीनंतर राजकीय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काय आतषबाजी होते याकडे लक्ष असेल...
जालना शहर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यानंतर जालन्यात राजकीय वातावरण तापलय.जालना शहर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षांमध्ये पहिला महापौर आमचाच होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महापालिकेत विरोधक म्हणून एकमेकांसमोर उभा राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपचाच महापौर करू असा नारा दिलाय तर शिवसेनेकडून पहिला महापौर करण्याचा दावा यापूर्वीच आमदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे...
जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्यात यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. जालन्यात मागील अनेक वर्षापासून आमदार अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल राजकीय विरोधक राहिलेले आहे. कैलास गोरंट्याल यांनी भाजप पक्ष प्रवेश केल्यामुळे आता अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल महायुतीचे भाग आहेत. मात्र असं असलं तरी दोघांकडून देखील महापौर आमचाच होणार असा दावा केला जात आहे. त्यामुळे जालना शहर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत न होता महायुतीमधील भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.
जालना शहर महापालिका निवडणुकीची रंगत हळूहळू वाढत आहे महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार असल्याचे संकेत होते. मात्र माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीत महायुती किंवा स्वतंत्र लढण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवला आहे.त्यामुळे भाजप नेत्यांकडून जालन्यात स्वबळाचे संकेत मिळण्यास सुरुवात झाली आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.