Pakistan Afghanistan conflict latest updates 
देश विदेश

Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा, १३३ तालिबानी मारल्याचा दावा, वाचा १० मोठ्या अपडेट

Pakistan Taliban tensions timeline : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. एअर स्ट्राईक, प्रत्युत्तर हल्ले आणि दोन्ही बाजूंचे मृत्यूचे दावे समोर आले आहेत. या संघर्षातील १० महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Pakistan Afghanistan conflict latest updates : भारताच्या शेजारी असणार्‍या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून अफगाणिस्तानच्या काबूल आणि कंधार या दोन शहरावर एअरस्ट्राईक करण्यात आला होता. त्याला अफगाणिस्तानकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या सैन्यांकडून पाकिस्तानच्या १५ चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला होता. त्याशिवाय ५६ पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. आता पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरोधात युद्धाची सुरूवात केली आहे. हवाई हल्ल्यात १३३ तालिबानी सैन्यांना मारल्याचा दावा पाकिस्तानकडून केला आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानने काबूल, कंधार प्रांतांमध्ये एअरस्ट्राईक केला. पाकिस्तानने या हल्ल्याला "ऑपरेशन गजब लिल-हक" असे नाव दिलेय असून खुले युद्धाची घोषणा केली. या हल्ल्यात १३३ तालिबानी सैन्यांना मारल्याचा दावा पाकिस्तानकडून कऱण्यात आला आहे. तर तालिबानकडून पाकिस्तानचे विमान पाडल्याचा दावा केला होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे. हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावासंदर्भातील महत्त्वाचे १० मुद्दे जाणून घेऊयात...

  • शुक्रवारी सकाळी पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पंक्तिया या ठिकाणी एअरस्ट्राईक केला. काबूलमध्ये किमान तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. या कारवाईत १३० हून अधिक तालिबानी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानने या लष्करी कारवाईला "ऑपरेशन गजब लिल हक" असे नाव दिले आहे.

  • पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानमधील २ कॉर्प्स मुख्यालये, ३ ब्रिगेड मुख्यालये, २ दारूगोळा डेपो, एक लॉजिस्टिक्स बेस, ३ बटालियन मुख्यालये, २ सेक्टर मुख्यालये आणि ८० हून अधिक टँक, तोफखाना आणि चिलखती वाहने नष्ट झाल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला.

  • पाकिस्तानने गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल रात्री उशिरा अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केला. पाकिस्तानच्या १५ चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा अफगाणिस्तानने केला.

  • अफगाणिस्तानचा दावा पाकिस्तानकडून फेटाळण्यात आला. कोणत्याही चौक्या ताब्यात घेतल्या नसल्याचे त्यांनी म्हटलेय.

  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आणि राजनैतिक मार्गाने वाद सोडवण्याचे आवाहन केले आहे.

  • ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले, १९ चौक्या आणि दोन तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा अफगाणिस्तानाकडून केला.

  • अफगाणिस्तानचा दावा पाकिस्तानकडून खोडून काढण्यात आला. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितले की फक्त दोन पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. १३३ अफगाण सैनिक मारले गेले आणि २०० हून अधिक जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला.

  • अफगाणिस्तानला पाकिस्तानचे सैन्य चिरडून टाकेल, असे शहबाज शरीफ म्हणाले. पाकिस्तान सरकारच्या एक्स पोस्टवर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया पोस्ट करण्यात आली. त्यामध्ये शरीफ म्हणाले, "आमच्या सैन्यात कोणत्याही आक्रमक महत्वाकांक्षा चिरडून टाकण्याची पूर्ण क्षमता आहे. संपूर्ण देश सशस्त्र दलांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे.

  • २,६११ किलोमीटर लांबीची ड्युरंड रेषा ही अफगाणिस्तानने औपचारिकपणे मान्य केलेली नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही प्राणघातक संघर्ष सुरू झाले होते. कतारच्या मध्यस्थीने युद्धबंदी केली झाली होती. पण नोव्हेंबरमध्ये झालेल्या शांतता चर्चेत कायमस्वरूपी करार होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील संघर्ष तीव्र झाला.

  • गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढलाय. त्याशिवाय पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत आहेत. या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तान असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. टीटीपी आणि बलुच फुटीरतावादी गट पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हल्ल्याला जबाबदार असल्याचे पाकिस्तान म्हणत आहे. अफगाणिस्तानकडून हा आरोप फेटाळण्यात आला. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानवर पाकिस्तानने हल्ला केला. यामध्ये ७० दहशतवादी मारल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तर अफगाणिस्तानने हा दावा खोडून काढत या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair damage from colors: आता बिंधास्त खेळा होळी! केसांची काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांनी दिल्या सोप्या टीप्स

Holi Pooja Steps: घरच्या घरी सोप्या पद्धतीने होळीची पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: महापालिकेने केला स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल

Holi Special Lassi Recipe: होळी स्पेशल घरच्या घरी बनवा थंडगार आणि क्रीमी लस्सी, वाचा सोपी रेसिपी

मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निर्दोष, वाचा कोर्टात काय झालं?

SCROLL FOR NEXT