Shreya Maskar
हिवाळ्यात साडी नेसायची असेल, तर पारंपरिक ब्लाऊजसोबत जॅकेट स्टाइल ब्लाऊज हा एक स्टायलिश पर्याय ठरू शकतो. यामुळे साडीला मॉडर्न आणि आकर्षक लुक मिळतो. थंडीपासून काही प्रमाणात संरक्षण मिळण्यासोबतच तुमचा लुकही उठून दिसतो.
साडीवर लाँग जॅकेट स्टाइल ब्लाऊज घातल्यास रॉयल आणि एलिगंट लूक मिळतो. हे जॅकेट कंबरेखाली किंवा हिप्सपर्यंत ठेवता येते. सिल्क, बनारसी किंवा प्लेन साडीसोबत हा प्रकार छान दिसतो.
भरजरी एम्ब्रॉयडरी, जरदोसी किंवा थ्रेडवर्क असलेले जॅकेट ब्लाऊज साडीला आकर्षक लुक देतात. लग्नसमारंभ आणि रिसेप्शनसाठी हा पर्याय उत्तम आहे. साध्या साडीसोबत असे ब्लाऊज अधिक उठून दिसतात.
हिवाळ्यात वेल्वेट फॅब्रिकचे जॅकेट स्टाइल ब्लाऊज ट्राय करू शकता. मऊ आणि जाडसर कापडामुळे थंडीपासून काही प्रमाणात संरक्षण मिळते. विशेषतः सिल्क किंवा पार्टीवेअर साडीसोबत वेल्वेट ब्लाऊज आकर्षक दिसतो.
कॉलर नेक असलेले जॅकेट ब्लाऊज साडीला स्मार्ट आणि मॉडर्न टच देतात. बंद गळा, बटणांची डिझाइन आणि फिटेड कट यामुळे हा लुक अधिक उठून दिसतो. ऑफिस पार्टी किंवा औपचारिक कार्यक्रमांसाठीही हा पर्याय निवडता येतो.
केप स्टाइल जॅकेट ब्लाऊज साडीला वेगळा आणि आकर्षक लुक देतात. खांद्यावरून खाली येणारी केप डिझाइन साडीला मॉडर्न अंदाज देते. रिसेप्शन, पार्टी किंवा खास कार्यक्रमांसाठी हा ट्रेंडी पर्याय आहे.
फुल स्लीव्ह जॅकेट ब्लाऊज हिवाळ्यात साडीवर घालण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये साधे, प्रिंटेड किंवा एम्ब्रॉयडरी असलेले डिझाइन्स निवडता येतात. थंडीच्या दिवसांत स्टायलिश लुक हवा असेल, तर हा प्रकार नक्की ट्राय करा.
जॅकेट स्टाइल ब्लाऊजसोबत हलके दागिने, आकर्षक कानातले आणि स्लीक हेअरस्टाइल निवडा. जॅकेटचा रंग साडीशी कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग ठेवल्यास लुक अधिक सुंदर दिसेल.