Paneer Biryani Recipe: घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट आणि मसालेदार पनीर बिर्याणी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

पनीर बिर्याणी बनवण्यासाठी २०० ग्रॅम पनीर, २ वाट्या बासमती तांदूळ, २ कांदे, २ टोमॅटो, दही, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर घ्या. यासोबत हळद, तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठही लागेल.

Paneer Biryani | yandex

तांदूळ शिजवून घ्या

सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर एका भांड्यात पाणी उकळून त्यात मीठ आणि थोडे खडे मसाले घाला. त्यात तांदूळ घालून ७० ते ८० टक्के शिजवून घ्या.

Paneer Biryani | yandex

पनीरला मसाला लावा

एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ एकत्र करा. त्यात पनीरचे चौकोनी तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा. साधारण १५ ते २० मिनिटे पनीर मॅरिनेट होऊ द्या.

Paneer Biryani Recipe | saam tv

कांदा आणि मसाला परतून घ्या

कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घालून शिजवा. टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात मॅरिनेट केलेले पनीर घालून काही मिनिटे परतून घ्या.

Paneer Biryani Recipe | yandex

बिर्याणीचे थर लावा

आता एका जाड बुडाच्या भांड्यात पनीरचा मसाला पसरवा. त्यावर शिजवलेला बासमती तांदूळ घाला. त्यावर तळलेला कांदा, पुदिन्याची पाने, कोथिंबीर आणि थोडे तूप घाला. अशा प्रकारे बिर्याणीचे थर तयार करा.

Paneer Biryani Recipe | Social Media

बिर्याणी दमवर शिजवा

भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण १५ ते २० मिनिटे बिर्याणी दमवर शिजवा. यामुळे पनीरचा मसाला आणि तांदळाचा सुगंध एकमेकांत छान मिसळतो. बिर्याणी शिजल्यानंतर गॅस बंद करा.

Paneer Biryani Recipe | yandex

गरमागरम पनीर बिर्याणी सर्व्ह करा

तयार झालेली पनीर बिर्याणी हलक्या हाताने मिक्स करा. गरमागरम बिर्याणी रायता, कांद्याच्या कोशिंबिरीसोबत सर्व्ह करा. हॉटेलसारखी चव असलेली घरगुती पनीर बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे.

Paneer Biryani Recipe

Kanjivaram Silk Saree Designs: पारंपरिक लुकला द्या रॉयल टच! कांजीवरम सिल्क साडीचे ७ सुंदर ट्रेंडिंग डिझाईन्स

Kanjivaram Silk Saree Designs
येथे क्लिक करा