Pahalgam Terror Attack saam tv
देश विदेश

Pahalgam Attack: 'कल्पना करून शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार', PM मोदी कडाडले

PM Modi On Pahalgam Attack: पीएम मोदी यांनी पहलगाममध्ये २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. 'कल्पना करून शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार', असे त्यांनी सांगितले.

Priya More

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट दहशतवाद्यांना इशारा दिला. 'हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ते कल्पना करु शकणार नाही अशी शिक्षा देणार', असा इशारा पीएम नरेंद्र मोदी यांनी दिला. बिहारमधील सभेत भाषण करताना त्यांनी पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य केले.

पीएम मोदी दहशतवाद्यांवर चांगलेच कडाडले. त्यांनी इशारा दिला की, 'पहलगाममधील क्रूरतेने कोट्यवधी भारतीय दुखी झाले आहेत. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देऊ. दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. या हल्लेखोरांना आता जमिनीत गाडून टाकण्याची वेळ आली आहे.'

पीएम मोदींनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'दहशतवाद्यांचे कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी हा हल्ला केलाय त्यांना कठोर शासन देणार. उरले सुरले दहशतवादी जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दोषीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांला शोधून काढून शिक्षा दिली जाईल.'

तसंच, ;'हा हल्ला फक्त पर्यटकांवर नाही तर देशाच्या आत्म्म्यावर करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी कल्पना केली नसेल असा धडा त्यांना शिकवला जाईल. या हल्ल्यात कुणी आपला भाऊ, मुलगा, नवरा गमावला आहे. यापुढे आम्ही दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. सर्व पीडित कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश उभा आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांच्या उपचारात सरकार सहकार्य करत आहे.', असे पीएम मोदींनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

SCROLL FOR NEXT