
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस फ्रान्सच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची बैठक विमानात झाली. पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत पॅरिस ते मार्सेल असा विमान प्रवास केला होता. याच प्रवासात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय परराष्ट्र सचिवांनी याला दुजोरा दिला असून भारत-फ्रान्स संबंध मजबूत झालेत. मिसरी यांच्या मते, मोदी आणि मॅक्रॉन यांनी परस्पर सामरिक भागीदारी, जागतिक घडामोडी, दहशतवाद, युरोप, पश्चिम आशिया आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील भू-राजकीय घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.
भेट संपण्यापूर्वी एका संयुक्त निवेदनात, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीची माहिती दिली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीचे कौतुक केले आणि ते पुढे नेण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक आणि रशिया-युक्रेन युद्धासह अनेक वादग्रस्त विषयांवर चर्चा केली. त्यांनी संरक्षण, अणुऊर्जा आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी आणि सहकार्यावरही चर्चा केली. त्यांनी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा केली.
भारत सरकारने या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर एक निवेदनही जारी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चर्चेत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंचा समावेश करण्यात आलाय. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, नागरी अणुऊर्जा आणि अवकाश या धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्याचाही आढावा घेतल्याचं या निवदेनात म्हटलंय. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. नुकत्याच पार पडलेल्या AI ऍक्शन समिट आणि 2026 मधील आगामी भारत-फ्रान्स इनोव्हेशन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भागीदारीच्या या क्षेत्राला अधिक महत्त्व येत असतं.
दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढवण्याचे आवाहन यावेळी केलं. दरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅरिस ते मार्सेल असा विमान प्रवास केला. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक आणि जागतिक मंच आणि उपक्रमांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी वचनबद्ध केले. बुधवारी पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत मार्सेली शहरातील ऐतिहासिक मझारागुएझ युद्ध स्मशानभूमीला भेट दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.