Pahalgam Terror Attack Saam Tv
देश विदेश

Pahalgam Attack: भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, पहलगाम हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशीच हाफिज सईदचा धमकीचा VIDEO व्हायरल

Pahalgam Terror Attack: पहलगामध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ५ मोठे निर्णय घेतले आहेत. भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला. त्यानंतर हाफिज सईदच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला.

Priya More

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसंच पाकिस्तानी राजदुतांना ७ दिवसांच्या आतमध्ये देश सोडण्यास सांगितले आहे. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानला जोरदार धक्का बसला आहे. भारत्याच्या या भूमिकेनंतर आता पाकिस्तानने भारताला नवीन धमकी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेट सुरक्षा समितीच्या उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ५ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. भारताने पाकिस्तानचे पाणी तोडले, अटारी बॉर्डर बंद केली, पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले. भारत्याच्या या निर्णयानंतर पाकिस्तानला जोराचा झटका बसला. त्यानंतर दहशतवादी हाफिज सईदच्या जुन्या व्हिडिओद्वारे पाकिस्तानने भारताला एक नवीन धमकी दिली आहे. 'जर पाणी थांबले तर रक्ताचे पाट वाहिल' पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी हाफिजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतीय कारवाईला घाबरला आहे. हल्ल्यानंतर सैफुल्लाह खालिद कसुरी याने पहिले विधान जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही. तर, काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. भारत सरकारने अटारी येथील चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील फिरोजपूरमधील हुसैनीवाला सीमेवर भारतीय रेंजर्स आणि पाकिस्तानी रेंजर्समधील दैनिक बीटिंग रिट्रीट कार्यक्रम देखील गुरुवारपासून थांबवला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या ५ मोठ्या निर्णयांनंतर पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर शांतता आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा बॅरिकेड काढून टाकण्यात आले आहेत. २३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठक झाली. या बैठकीमध्ये भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, अटारी चेकपोस्ट बंद केला आहे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे आणि भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत, पाकिस्तानी सल्लागारांना भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत आणि उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ ​​वरून ३० पर्यंत कमी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT