Hindavi Patil Viral Video: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा लावणी कार्यक्रमात निषेध; हिंदवी पाटीलने दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
Pahalgam Terror Attack: जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडून निषेध आणि संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी दौंड मधील भर कार्यक्रमात लावणी कलावंत आणि रिल्स स्टार हिंदवी पाटील हिने 'पाकिस्तान मुर्दाबादच्या' घोषणा दिल्या यावेळी प्रेक्षकांनी देखील हिंदवी पाटील हिच्या पाकिस्तान विरोधातील घोषणाबाजीला प्रचंड प्रतिसाद दिला. दरम्यान, हिंदवी पाटील हिने शोक व्यक्त केला.
घटना नेमकी कधी घडली?
मंगळवारी जम्मू- काश्मिरमध्ये येथील पहलगाम (Pahalgam) येथे मोठी घटना घडली. जिथे बैसरन पर्वतावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जवळपास २८ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशरातून या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया येत आहे. त्यातच हिंदवी पाटीलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे.
हिंदवी पाटील ही सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहे. जिला एक रिल्स स्टार आणि मुख्य म्हणजे लावणी कलाकार म्हणून ओळख आहे. सध्या तिच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओने ती एक कलाकार नाही तर संवेदनशील नागरिक आहे हे स्पष्ट होते.
हिंदवी पाटीलचा हा व्हिडिओ(Video) दौंडमधील लावणी कार्यक्रमातील आहे. जो सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लाखोंच्या घरात यूजर्संनी पाहिला असून असंख्य लाईक्सही याला मिळालेले आहेत.
त्यातच अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''प्रत्येक नागरिक भावूक झालेला आहे या घटनेनंतर'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''जे झालं खूप भयंकर घडलं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.