Pahalgam: 'माझं नाव भारत अन् मी हिंदू', मुलाला पत्नीकडं द्यायला सांगितलं आणि धाडधाड गोळ्या झाडल्या

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या भ्याड आणि अमानुष दहशतवादी हल्ल्यात तब्बल २८ भारतीय नागरिकांचा बळी गेला असून, यामध्ये बंगळूरूतील अभियंता भारत भूषण यांचाही मृत्यू झाला आहे.
Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror AttackSaam
Published On

जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात एकूण २८ भारतीयांना जीवाला मुकावे लागले. या भीषण हल्ल्यात बंगळूरूतील ४१ वर्षीय अभियंता भारत भूषण यांचाही मृत्यू झाला आहे. २२ एप्रिलला भारत आपल्या पत्नी आणि मुलांसोबत पहलगाममध्ये फिरायला गेले होते. त्याठिकाणी काही दहशतवादी आले आणि त्यांनी भारतला घेरलं. दहशतवाद्यांनी त्यांना विचारलं आणि भारत हे नाव ऐकताच दहशतवाद्यांनी धडाधड गोळ्या झाडल्या. पत्नी आणि मुलांसमोरच त्यांचा मृत्यू झाला.

हिंदू आहात का? अन् नंतर गोळ्यांचा वर्षाव

जावयाचा मृत्यू हल्ल्यात झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या सासूबाईंनी मीडियाशी बोलताना सांगितले की, दहशतवाद्यांनी आधी भारतला थांबवलं. त्याला घेरलं. नंतर त्याला 'तुझं नाव काय? तुझं धर्म काय?' असा प्रश्न विचारला. तेव्हा भारतने, 'माझं नाव भारत आणि मी हिंदू आहे', असं त्याने उत्तर दिलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी भारतवर गोळ्यांचा भडिमार सुरू केला. जमिनीवर कोसळेपर्यंत दहशतवादी गोळीबार करत राहिले.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले या हल्ल्याशी आमचा...

पत्नीवर दुखा:चा डोंगर

भारतची पत्नी सुजाता या डॉक्टर आहेत. त्यावेळी सुजाताने आपल्या मुलाचे प्राण वाचवणे उचित समजले. त्यांनी पर्स, मोबाईल आणि मुलाला घेऊन तातडीने तेथून पळ काढला. भारतीय सैन्याने तिला आणि तिच्या मुलाला तातडीने सुरक्षितस्थळी पोहोचवले.

Pahalgam Terror Attack
धावत्या AC बसमध्ये कपलचे शरीरसंबंध, बस कंडक्टर गोत्यात, २२ सेकंदाचा VIDEO व्हायरल; नवी मुंबईत धक्कादायक प्रकार | Navi Mumbai

कुटुंबावर दुखा:चा डोंगर

भारत भूषण हे मुळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी. ते आपल्या कुटु्ंबासोबत बंगळूरूच्या मट्टीकेरे भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सुट्टीसाठी ते आपल्या कुटुंबासोबत पत्नी आणि मुलासह काश्मीरला गेले होते. दरम्यान, हसत खेळत पार पडणारी सुट्टी एका रक्तरंजित थरारामध्ये बदलेल याची कल्पना कुणालाही नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com