India Pakistan Google
देश विदेश

India Pakistan Crisis : दणके सुरुच! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानवर आणखी एक मोठं संकंट

Operation Sindoor updates : भारताकडून पाकिस्तानला दणके सुरुच आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानवर आणखी एक मोठं संकंट उभं ठाकलंय.

Vishal Gangurde

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'एअर स्ट्राईक' करत बदला घेतला आहे. भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारताने एकूण ९ ठिकाण 'ऑपरेशन सिंदूर' राबवून उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्य दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे भारताने केलेल्या वॉटर स्ट्राईकचा परिणामही दिसू लागला आहे. पाकिस्तानच्या खानपूर धरणातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानवर पाण्याचं मोठं संकंट उभं ठाकलं आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या रिपोर्टनुसार, खानपूर धरणाच्या पाणीपातळीत घट झाल्याने पाकिस्तानातील रावळपिंडी आणि इस्लामाबाद या दोन मोठ्या शहरांवर मोठं पाणीसंकंट उभं ठाकलं आहे. धरणात फक्त ३५ दिवस पुरेल, इतकेच पाणी उपलब्ध आहे. आगामी १० ते १५ दिवसांत पाऊस झाला नाही, तर धरणातील पाण्याची पातळी वेगाने कमी आणि जवजवळ मृत पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

धरणाच्या मुख्य भागात दगड आणि मातीचे थर दिसू लागले आहेत. यामुळे पाकिस्तानातील रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये राहणाऱ्या लोकांवर मोठं पाणीसंकंट ओढावलं आहे. अधिकाऱ्यांच्या मतानुसार, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

खानपूर धरणाची पाणीपातळी १,९३५ फूट इतकी आहे. मंगळवारी पाण्याची आवक ८२ क्युसेक आणि विसर्ग २३५ क्युसेक इतकी नोंदवण्यात आली. धरण प्राधिकरणाला भीती आहे की, 'परिस्थिती अशीच राहिल्यास पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये सिंचनासाठीचा पाणीपुरवठा थांबवावा लागेल. तसेच धरण प्राधिकरणाला रावळपिंडी आणि इस्लामाबाद शहरात पिण्याचा पाण्याचा पुरवठा कमी करावा लागेल.

कॅपिटल डेव्हलपेंट अथॉरिटीला दररोज ९० क्युसेक पाणीपुरवठा तक्षशिला अभियांत्रिक आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, नगरपालिका संस्थांना कारावा लागतो. तर छोट्या लाभार्थ्यांना ६.१८ क्युसेक पाणीपुरवठा करावा लागतो. सिंचनासाठी खैबर पख्तूनख्वाला ४८ क्युसेक आणि पंजाबला ४२ क्युसेक पाणी मिळते. मात्र, खानपूरच्या धरणात पाणीपातळी घटल्याने पाकिस्तानवर नव संकंट उभं ठाकलं आहे.

धरण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, 'पुढील आठवड्यापासून खैबर पख्तूनख्वा आणि पंजाबचं सिंचनासाठीचा पाणीपुरवठा थांबवावा लागण्याची शक्यता आहे. जलसंकंटामुळे वॉटर अँड सॅनिटेशन एजन्सीने 'वॉटर कंट्रोल प्लान' लागू केला आहे. यात पाणी चोरीवर कारवाई, पाण्याचं बिल न भरण्याऱ्यांना दंड आणि पाण्याचा अनावश्यक वापर करण्यावर प्रतिंबंध करणे या सारख्या बाबींचा समावेश आहे. पावसाचं आगमन लवकर झालं नाही, तर पाकिस्तान मोठ्या जलसंकंटात सापडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT