Operation Sindoor Video : ९ ठिकाणं, २५ मिनिटं... कसं फत्ते झालं ऑपरेशन सिंदूर? पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ९ व्हिडिओ

Air Strike On Pakistan Video : भारतीय लष्करानं पहलगाम हल्ल्याचा अखेर बदला घेतला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ९ व्हिडिओ
operation sindoor Videosaam tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला करून ज्या महिला-भगिनींचे कुंकू पुसलं, त्या पुसलेल्या कुंकवाची किंमत या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला मोजावी लागलीय. भारतानं दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त करून टाकले. ९ ठिकाणांवर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. भारतानं फक्त पीओकेच नाही तर, पाकिस्तानमध्ये घुसून जोरदार प्रहार केला. या हवाई हल्ल्याचे ९ व्हिडिओ समोर आले आहेत.

पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ९ व्हिडिओ
Operation Sindoor: पाकिस्तानमधील ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक, भारतीय लष्कराने व्हिडीओ दाखवले

पाकिस्तानला उद्ध्वस्त करणारे ९ व्हिडिओ

भारतीय लष्करानं गाजवलेल्या पराक्रमाचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. लक्ष्य किती अचूक टिपलं आहे हे या व्हिडिओंतून दिसतं. भारतीय लष्कराने हे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. त्यात सर्व ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचे दिसते. तसेच भारताने हवाई हल्ल्यात वापरलेल्या मिसाइल आहेत. काही व्हिडिओंमध्ये (Operation Sindoor) तर स्फोटांचे आवाज येत आहेत. हल्ला झालेल्या ठिकाणी स्थानिकांचा आरडाओरडा ऐकू येत आहे. हल्ल्यानंतरची अवस्था बघून तो किती तीव्र आहे, याचा अंदाज येत आहे.

या ९ ठिकाणांना केलं टार्गेट

भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पीओकेमध्ये मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर, मरकज तैयबा-मुरीदके, सरजाल - तेहरा कलां, महमूना जोया फॅसेलिटी, सियालकोट, मरकज अहले हदीस बरनाला-भिम्बर, मरकज अब्बास-कोटली, मस्कर राहिल शाहीद - कोटली, मुजफ्फराबादमध्ये शावई नाला कॅम आणि मरकज सैयदना बिलाल या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं.

जाणकारांच्या मते, मुरीदके आणि बहावलपूरमधील काही परिसर अत्यंत सुरक्षित मानले जातात. पाकिस्तानी सैन्याचा वेढाही तिथे कायम असतो. त्याच ठिकाणी असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई आणि ती सुद्धा यशस्वीपणे करणे हे भारताच्या तिन्ही दलांचं मोठं यश मानलं जात आहे. पाकिस्ताननेही हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, जे दहशतवादी मारले गेले आहेत, त्यांची आकडेवारी दडवली जात असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ९ व्हिडिओ
Operation Sindoor : मसूदचा मदरसा भारताकडून उद्ध्वस्त, दहशतवादाला प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com