Operation Sindoor success and warning to Pakistan by Indian Army  Operation Sindoor success and warning to Pakistan by Indian Army
देश विदेश

भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, कारगिल विजय दिनानिमित्त लष्कर प्रमुखांनी डागली तोफ

Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिनी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला स्पष्ट इशारा, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचं सांगत भारतीय लष्कराच्या तयारीचं सविस्तर चित्र सादर केलं.

Namdeo Kumbhar

  • कारगिल विजय दिवस 2025 निमित्त लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला स्पष्ट इशारा

  • ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानच्या कारवायांना दिलेलं संयमी प्रत्युत्तर

  • रुद्र, भैरव युनिट्सची स्थापना; आधुनिक लष्कराची दिशा

Operation Sindoor success and warning to Pakistan by Indian Army : दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, कोणत्याही परिस्थिती ते आता वाचणार नाहीत. ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण देत भारताच्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. कारगिल विजय दिनाला बोलताना चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भविष्यातील भारताची तयारी आणि योजनाबाबत माहिती दिली. त्याशिवाय पाकिस्तानवर टीकेची तोफ डागली. रुद्र, भैरव यासारख्या यूनिट्सची स्थापना आणि Operation Sindoor च्या यशावर जोर देत पाकिस्तानला सुधारण्याचा इशारा दिला आहे. त्यासोबतच लडाखमधील इ्न्फ्रास्ट्रक्चर आणि बॉर्डर टूरिज्मवरही लष्कराची भूमिका स्पष्ट केली.

कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय सैन्याच्या तयारी, बदल याबाबत माहिती दिलीच. त्याशिवाय पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराबाबत रोखठोक मत मांडले. ७ ते ९ मे या दरम्यान पाकिस्तानकडून झालेल्या कारवायांना भारतीय सैन्याने अचूक आणि संयमित प्रत्युत्तर दिले. आर्मी एअर डिफेन्स एक अभेद्य भिंत म्हणून उभी राहिली, कोणत्याही ड्रोन किंवा मिसाईलने भेदू शकली नाही, असे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरवेळी मिळालेले हे यश 'व्होल-ऑफ-नेशन अप्रोच'चा परिणाम आहे. त्यामध्ये सैन्य, वायुसेना, नौदल आणि इतर सरकारी विभागांनी एकत्र काम केले, असे जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, "भारताच्या सार्वभौमत्वाला, अखंडतेला किंवा नागरिकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शक्तीला आता चोख प्रत्युत्तर मिळेल. भारतीय सैन्य आता एक परिवर्तनशील, आधुनिक शक्ती म्हणून वेगाने पुढे जात आहे. "

कारगिल विजय दिवस -

26 जुलै, हा भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करणारा दिवस आहे. 1999 मध्ये, कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी घुसखोरांचा पराभव करून आपल्या मातृभूमीचे रक्षण केले. कठोर हिमालयीन प्रदेशात, प्रचंड आव्हानांना तोंड देत, सैनिकांनी अतुलनीय धैर्य दाखवले. ऑपरेशन विजय अंतर्गत, त्यांनी शत्रूच्या ताब्यातील उंच शिखरे परत मिळवली. त्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला. या युद्धात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण हा दिवस करतो. कारगिल विजय दिवस आपल्याला देशभक्ती, एकता आणि सैनिकांच्या निःस्वार्थ सेवेची प्रेरणा देतो.

कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो?

26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 1999 मध्ये कारगिल युद्धात भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.

कारगिल युद्ध कोणत्या देशांमध्ये झाले?

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कारगिल युद्ध झाले.

कारगिल युद्धाचे मुख्य कारण काय होते?

पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी कारगिलच्या नियंत्रण रेषेवर घुसखोरी केली.

कारगिल या युद्धात भारताच्या विजयाचे नाव काय आहे?

ऑपरेशन विजय.

कारगिल विजय दिवसाचे महत्त्व काय आहे?

भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाला सलाम करणे आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

SCROLL FOR NEXT