Maharashtra Politics : ठाकरेंसोबत आमदार-खासदार फक्त नावाला, लवकरच भाजपात दिसतील, संकटमोचकाच्या वक्तव्याने राजकीय भूकंपाचे संकेत

Girish Mahajan News : ठाकरेंचे आमदार-खासदार मशालीची साथ सोडणार असल्याचे वक्तव्य भाजपचे संकटमोचक महाजन यांनी केला आहे. त्यांच्या याखळबळजनक दाव्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra Politics
Girish Mahajan claims Thackeray’s MLAs MPs contact with BJPSaam TV News Marathi
Published On
Summary
  • ठाकरे गटाचे अनेक आमदार, खासदार भाजपच्या संपर्कात

  • तांत्रिक कारणांमुळे अजूनही ते ठाकरे गटात

  • स्थानिक निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता

Girish Mahajan claims Thackeray’s MLAs MPs contact with BJP : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं राजकीय वक्तव्य केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, फक्त केवळ तांत्रिकदृष्ट्या ते उध्दव ठाकरे गटात आहेत असं खळबळजनक विधान महाजन यांनी केले. ते पंढरपुरात बोलत होते.

महाजन यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री गरीश महाजन आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी महाजन यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार असल्याचे संकेत दिले. मागील पाच दिवसानंतर महाजन पुन्हा दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे गट फुटणार असा दावा करत राजकीय भूकंपाचे संकेत दिले.

Maharashtra Politics
Ajit Pawar News : काही लोक विकृत असतात, अजित पवारांनी आमदार सोनवणेंना सुनावले

काँग्रेससह सगळ्याच पक्षाचे लोक भाजपमध्ये यायला तयार आहेत. यामध्ये सर्वाधिक उबाठा गटाचे आमदार आणि खासदार आहेत. पण काही तांत्रिक बाबींमुळे ते ठाकरे गटात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेकजण भाजपात आल्याचे दिसतील असे त्यांनी नमूद केले. मंत्रीमंडळ फेरबदलाच्या चर्चेविषयी विचारले असता, संजय राऊत हे सगळं मंत्रिमंडळ हटवायला बसले आहेत. त्यांना वाटत यांचं मंत्रिमंडळ जावं आणि आमचं मंत्रिमंडळ यावं. संजय राऊत यांना कोण विचारते. वायफळ बडबड करायची, खोटं बोलून रेटून न्यायचं, हा संजय राऊत यांचा धंदा झालाय, अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर टीका केली. दरम्यान हॅनी ट्रॅप हा विषय माझासाठी संपल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics
सरकारी काम, सहा महिने थांब... शिक्का पुसला जाणार, KDMC मध्ये राज्यातील पहिला प्रयोग, १५ ऑगस्टपासून सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com