Oman Oil Tanker Capsized Saam Tv
देश विदेश

Oman Oil Tanker: समुद्रात बुडाले तेलवाहू जहाज, १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता

13 Indians, 3 Sri Lankans missing after oil tanker capsizes off Oman: ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडाले आहे. या जहाजावर १६ जण होते. त्यापैकी १३ भारतीय नागरिक आणि ३ श्रीलंकेचे नागरिक होते. बेपत्ता झालेल्या सर्वांचा शोध सुरू आहे.

Priya More

ओमानच्या किनारपट्टीवर तेलवाहू जहाज बुडाल्याची (Oman Oil Tanker Capsized) घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ११७ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज ओमानच्या किनाऱ्यावर बुडाले. या जहाजावर असलेले १६ जण बुडाले आहेत. यामध्ये १३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या सर्वजणांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू टँकर बुडाला आहे. या जहाजावर १६ जण होते. त्यापैकी १३ भारतीय नागरिक आणि ३ श्रीलंकेचे नागरिक होते. जहाज बुडाल्यानंतर हे सर्व जण बेपत्ता झाले. या सर्व बेपत्ता सदस्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु अद्याप यापैकी कोणाचाही शोध लागलेला नाही. या तेलवाहू जहाजाचे नाव प्रेस्टिज फाल्कन असे होते.

या तेलवाहू जहाजावर पूर्व आफ्रिकन देश कोमोरोसचा ध्वज होता. मंगळवारी हा तेलवाहू जहाज ओमानच्या इंडस्ट्रियल डुक्म नावाच्या मुख्य बंदराजवळ अचानक बुडाले. तेलवाहू जहाज बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. या सर्वांचा शोध सुरू आहे.

'कोमोरोस देशाचा - ध्वज असलेले तेलवाहू जहाज ड्यूकम बंदर शहराजवळ रास मदारकाच्या आग्नेय-पूर्वेला २५ नॉटिकल मैलांवर बुडाले. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.', अशी माहिती मरीटाईम सिक्युरिटी सेंटरने (एमएससी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

ड्यूकम बंदर ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर आहे. हे बंदर सुलतानाच्या प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांच्या अगदी जवळ आहे. यामध्ये एक प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. ड्यूकम हे ओमानचे एकमेव सर्वात मोठं बंदर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT