रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले, तरीही अजूनपर्यंत १४७९ गावांना १०२७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. हीच टँकरची संख्या आठ दिवसापूर्वी १७०० च्या वर होती. मात्र काही ठिकाणी पाऊस पडल्याने यामध्ये घसरण होऊन टँकरची संख्या घटली.
यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण पाणी टंचाई (Water scarcity) जाणवत होती. प्रामुख्याने मराठवाड्यात अधिक दाहकता पाहण्यास मिळाली. साधारण मार्च महिन्यापासूनच पाण्याची समस्या जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करत पाण्याची तहान भागविली जात होती. दरम्यान यंदा पावसाचे आगमन लवकर झाले असले तरी पुरेसा पाऊस झाला नाही. यामुळे पाण्याची समस्या अद्याप पूर्णतः मिटलेली नाही. यामुळे पाण्याचे टँकर अजूनही सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहेत.
सर्वाधिक टँकर संभाजीनगर जिल्ह्यात
छत्रपती संभाजीनगर (sambhajinagar) जिल्ह्यातील ३६३ गावांना सद्यस्थितीला ५६० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून मराठवाड्यात सर्वाधिक टँकरची संख्या या जिल्ह्यात आहे. दरम्यान यंदा मे महिन्यात ओढावणारी स्थिती एप्रिल महिन्यातच निर्माण झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावं लागलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.