Kalyan News : सराईत महिला चोर गजाआड; नऊ गुन्ह्यांची उकल बारा मोबाईल जप्त

Kalyan News : आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत होती.
Kalyan Railway Station
Kalyan Railway StationSaam tv

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण रेल्वे क्राइम ब्रांचच्या सतर्कतेमुळे एक सराईत महिला चोर गजाआड झाली आहे. या महिलेकडून ९ गुन्ह्यांची उकल झाली असून आतापर्यंत बारा मोबाईल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. 

Kalyan Railway Station
Sakri News : बकऱ्या चारण्यावरून दोन गटात वाद; पोलीस व्हॅनवरही केली दगडफेक

आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने या चोरट्याचा शोध सुरू केला. रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागत नव्हता. रेल्वे क्राईम ब्रांचने आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान (Kalyan Railway Station) व रेल्वे स्थानकावर गस्ती वाढवल्या. या दरम्यान एक महिला त्यांना संशयास्पद फिरताना आढळली. पोलिसांचा संशय बळवल्याने पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. 

Kalyan Railway Station
Chandrapur News : पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; विवाहितेच्या हत्येप्रकरणी होता ताब्यात

सुरुवातीला महिलेने (Kalyan) उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. या महिलेला पोलिसी खाक्या दाखवताच तिने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. अश्विनी भंडारी असं या महिलेचे नाव असून गेल्या वर्षभरापासून ती आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी करत होती. तिच्याकडून आत्तापर्यंतचे कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडलेल्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तिच्या जवळून चोरी केलेले १२ महागडे मोबाईल जप्त करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com