Chandrapur News : पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; विवाहितेच्या हत्येप्रकरणी होता ताब्यात

Chandrapur News : वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत २६ जूनला आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २५) या विवाहितेची हत्या करण्यात आली होती.
Chandrapur News
Chandrapur NewsSaam tv

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन सेवा प्रकल्पात ४ दिवसांपूर्वी झालेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी असे आहे. 

Chandrapur News
Ahmednagar News : ऐन पावसाळ्यात पिके वाचवण्यासाठी धडपड; पिकांना स्प्रिंकलरने दिले जातेय पाणी

वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत २६ जूनला आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २५) या विवाहितेची हत्या करण्यात आली होती. (Chandrapur) हिंगणघाट येथील सासर सोडून आरती काही महिन्यांपासून आपल्या आई- वडिलांसोबत वास्तव्याला होती. आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असल्याने तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता. तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र त्याने आरतीची हत्या केली होती. आरतीच्या हत्येमागे लव्ह - ब्रेकअप - मर्डर असे वळण असल्याचे पोलिस (Police) तपासात समोर आले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला चोवीस तासात अटक केली. 

Chandrapur News
Sakri News : बकऱ्या चारण्यावरून दोन गटात वाद; पोलीस व्हॅनवरही केली दगडफेक

या प्रकरणातील आरोपी समाधानला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, आरोपीने रात्री पोलीस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली. बुटाच्या लेसचा आत्महत्येसाठी वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहीती पुढे येत आहे. घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com