गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात असलेले पालिताना हे जगातील पहिले असे शहर घोषित करण्यात आले आहे, जिथे मांसाहारावर बंदी घालण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर येथे मांसासाठी प्राण्यांची हत्या, तसेच मांस विक्री आणि सेवन हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे. आता पालीतानात फक्त मांस आणि अंडी विक्रीवरच बंदी आहे असे नाही तर जनावरांच्या कत्तलीला देखिल बंदी घालण्यात आली आहे. हा नियम मोडणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
सुमारे 200 जैन भिक्षूंनी तब्बल 250 मांसाची दुकाने बंद करण्याची मागणी करत निदर्शने केली होती. यानंतर आता मांसासाठी जनावरांची हत्या करणे, मांस विकणे, मांस खाणे हे पालीतानात बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. म्हणजेच आता मांस खाल्ले तर ते गुन्ह्याच्या कक्षेत येणार आहे. आणि यावरून तुम्हाला शिक्षा देखिल होऊ शकते.
गुजरातमधील पालितानामध्ये मांसाहारावर बंदी घालण्यात आली आहे. मांसाहारावर नाराजी असणाऱ्या टीकाकारांनी मांसाचे दृश्य त्रासदायक असते आणि यामुळे अनेक लोकांवर, विशेषत: लहान मुलांवर नकारात्मक प्रभाव पडतो असा युक्तिवाद केला आहे.
गुजरातमधील राजकोट या शहरातही मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणी मांसाहारी पदार्थ तयार करणे आणि विकणे यावर बंदी असणार आहे. वडोदरा, जुनागड आणि अहमदाबादमध्येही असेच नियम करण्यात आले आहेत. मांसाच्या सार्वजनिक प्रदर्शनामुळे नागरिकांच्या संवेदना दुखावतात आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो, असे अनेकांचे म्हणणे आहे.
पालीताना हे सामान्य शहर नाही तर ते जैन समाजाचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. त्याला "जैन मंदिर शहर" असे टोपणनाव देखिल आहे. शत्रुंजय टेकड्यांभोवती वसलेले हे अतिशय सुंदर शहर आहे. शहरात 800 हून अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आदिनाथ मंदिर आहे. या मंदिरांना दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक भेट देतात. ज्यामुळे शहराचे आध्यात्मिक महत्त्व वाढले आहे.
मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणारे आदेश राजकोटमधून आले आहेत. या आदेशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मांसाहारी पदार्थ तयार करण्यास आणि विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. जुनागढ आणि अहमदाबादमध्ये समान नियम लागू करून वडोदराने लगेचच त्याचे अनुकरण केले आहे. मांसाहाराच्या विरोधकांनी मांसाच्या प्रदर्शनामुळे त्यांच्या संवेदना दुखावल्या जातात.आणि त्याचा नागरिकांवर आणि खास करून लहान मुलांवर नकारात्मक परिणाम होतो असा युक्तिवाद केला आहे.
गुजरातमधील शाकाहारावर प्रामुख्याने वैष्णव हिंदू संस्कृतीचा जोरदार प्रभाव आहे. गुजरातची लोकसंख्या 88.5 टक्के हिंदू, 1 टक्का जैन आणि 10 टक्के मुस्लिम आणि ख्रिश्चन अशी आहे. त्यामुळे वैष्णव हे राज्याच्या संस्कृतीचा आधार आहेत. शाकाहारासाठी होणारा बदल सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.