मुंबई : मुंबईकरांची लाइफलाइन म्हटलं की आता गर्दी असतेच. या गर्दीतून काही प्रवाशांना तास-दीड तास उभं राहूनच प्रवास करावा लागतो. या लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेक जण मोबाईलमध्ये गुंतलेले पाहायला मिळतात. या लाइफलाइनमध्ये अनेकांनी डोके मोबाईलमध्ये घातलेले पाहायला मिळते. अनेक प्रवासी मोबाईलमध्ये सिनेमे, सोशल मीडिया पाहताना दिसतात. याच गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये क्वचित सुखावणारे क्षण पाहायला मिळतात. या लोकल ट्रेनमधील प्रवाशांनी शाहरुख खानचं गायलेलं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवर गायक सोनू निगम यांनी भन्नाट रिअॅक्शन दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत प्रवासी गायक सोनू निगमचं हिट गाणं गाताना पाहायला मिळत आहे. १९९७ सालच्या 'परदेस' सिनेमातील प्रसिद्ध गाणं आहे. लोकल ट्रेनच्या डब्यात प्रवासी तालासुरात गाणं गाताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ एका युजर्सने शेअर केला आहे. या इन्स्टाग्राम युजर्सने कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'कला त्याचं स्थान शोधतेच'. सोनू निगमने या पोस्टवर कमेंट करताना म्हटलं की, 'किती सुंदर आहे. यामुळे खूप आनंद मिळतो. तुमच्यावर देवाची कृपा कायम राहो'.
व्हायरल व्हिडिओ कमेंटचा वर्षाव
४ दिवसांपूर्वी शेअर केलेला व्हिडिओ आतापर्यंत ८ मिलियन्स लोकांहून अधिक जणांनी पाहिला आहे. तर या व्हिडिओला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. तर अनेक युजर्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हायरल व्हिडिओवर एका कमेंट केली की, 'ही गोष्ट फक्त मुंबईतच होऊ शकते'. तर दुसऱ्याने म्हटलं की, 'दिवसभर काम केल्यानंतर लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीत आनंदी राहणं ही मोठी बाब आहे. प्रवास करता करता आनंद घेणे हे तुम्ही स्वत:हून निवडता ही मोठी बाब आहे'.
लोकल ट्रेन प्रवाशांनी भरली आहे. ट्रेनमध्ये काही जण सीटवर बसलेले दिसत आहेत. तर काही जण उभे आहेत. या लोकल डब्यात काही जण गाणे गाताना दिसत आहेत. तर काही जण वाजवताना दिसत आहेत. एका प्रवाशाचा गाण्याचा आवाजाने ट्रेनमधील वातावरण आनंदमय झाल्याचे दिसत आहे. या गाण्याने अनेकांच्या चेहऱ्यावरील थकवा देखील कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. हाच हटके व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.