Mumbai Rain Video : मुंबईकरांचे हाल, मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, लोकल ट्रेन उशिराने

Mumbai Local Train News : मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला आहे. पावसामुळे लोकल ट्रेनही उशिराने धावत आहेत.
मुंबईकरांचे हाल, मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, लोकल ट्रेन उशिराने
Mumbai Rain NewsFile photo

विकास काटे, साम टीव्ही प्रतिनिधी

ठाणे : ठाणे जिल्हा परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे रस्त्यावरही पाणी साचले आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला आहे. गुरुवारी सकाळी पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेलाही पावसाचा फटका बसला आहे. यामुळे ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वे वाहतूक उशिराने

मुंबईसह ठाणे परिसरात सकाळपासून पडणाऱ्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गांना फटका बसला आहे. एकीकडे पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. तर मध्य रेल्वेही ठाण्याकडून मुंबईकडे १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने कामाला जाणाऱ्या नोकरदारांना उशिरा ऑफिस गाठावं लागलं आहे.

मुंबईकरांचे हाल, मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, लोकल ट्रेन उशिराने
Dhule Rain: धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस; पुराचे पाणी गोठ्यात शिरल्याने सात गुरांसह बकऱ्यांचा मृत्यू

पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने

मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. विरारसहित पालघरमध्येही मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरून प्रवास वाहतूक करणाऱ्या प्रवासी, नोकरदारांना उशिरा कार्यालय गाठावं लागलं आहे.

पावसामुळे डहाणू-विरार लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. ट्रॅकजवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या गतीने सुरु आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असल्याची माहिती मिळत आहे.

कल्याण, बदलापुरात तुफान पाऊस

उल्हासनगर, अंबरनाथ ,बदलापूर आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये अनेक दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कल्याणमध्ये मागील अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने काही रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय.

सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कल्याण पूर्व परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस ही कोंडी काढण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईकरांचे हाल, मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, लोकल ट्रेन उशिराने
Ratnagiri Rain Video: रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं, खेड शहरातील गांधी चौकात पूर सदृश्य परिस्थिती

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. २० जून उजाडलं तरी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली नव्हती. मात्र, आज सकाळपासून शहापूर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com