Navi Mumbai Water Shortage: नवी मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी! मोरबे धरणात फक्त ३८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

Morbe Dam Water Supply: नवी मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात फक्त ३८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी आहे.
Morbe Dam Water Supply
Morbe Dam Water SupplySaam Tv
Published On

शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच नवी मुंबई महापालिकेने आठवड्यातून ३ दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यातच आता नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ ३८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात चांगला पाऊस न पडल्यास नवी मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच नागरिकांना पाणी जपून वापरण्यास सांगण्यात येत आहे.

अपेक्षित पाऊस न पडल्याने शहराला रोजचा पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाबाबत बारीक लक्ष ठेवून आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महापालिकेच्या आठही विभागात आठवड्यातून दोन दिवस सायंकाळच्या पाणीपुरवठ्यात वाढ केली आहे. परंतु तीन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

मोरबे धरणात फक्त २५.२८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा ३८ दिवसच पुरेल इतकाच आहे. म्हणजेच २५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल एवढेच पाणी धरणात शिल्लक आहे. साधारणत जून महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ही परिस्थिती निर्मण झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात २९.५० टक्के पाणीसाठा होता. यावर्ष पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

Morbe Dam Water Supply
Maharashtra Politics : विधानसभेसाठी भाजपची रणनिती ठरली; महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत दिल्लीत काय निर्णय झाला? पाहा VIDEO

मोरबे धरणासह मुंबईतीलदेखील इतर धरणांमध्ये कमी पाणासाठी शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांनादेखील पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागेल. तर पुणेकरांनादेखील पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात फक्त ३.७६ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते.

Morbe Dam Water Supply
Maharashtra Rain News : महाराष्ट्रात आज अन् उद्या कुठे-कुठे पडणार पाऊस? वाचा हवामान खात्याचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com