Six Odisha Congress MLAs reportedly reach Bengaluru ahead of Rajya Sabha elections, triggering political speculation. Saam Tv
देश विदेश

काँग्रेसचे 6 आमदार नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात भूकंप

Congress Mlas Not Reachable Political Crisis Odisha: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे सहा आमदार अचानक नॉट रिचेबल झाले असून ते बंगळुरूमधील फार्महाऊसमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

देशातील 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागेवर निवडणुका होत असून 16 मार्चला मतदान पार पडणार आहे. मात्र या निवडणुकीआधीच ओडीशाचे आमदार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांनी या 6 आमदारांना बोलावून घेतले आहे. ओडिशामध्ये काँग्रेसने एकही उमेदवार उतरवला नसला तरी बीजू जनता दलाच्या (BJD) उमेदवाराला हे आमदार पाठिंबा देत होते.

कोणते आमदार बंगळुरूला पोहोचले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडीशाचे काँग्रेसचे 6 आमदार गुरुवारी रात्रीच बंगळुरूला पोहोचले आहे. ते एका फार्म हाऊसवर असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये आमदार अशोक कुमार दास, प्रफुल्ल चंद्र प्रधान, पबित्रा सौटा, कद्रका अप्पाला स्वामी, राजेन एक्का आणि सत्यजित गोमांगो यांची नावे समोर आली आहे.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी ओडिशाहून बेंगळुरूला प्रवास करणाऱ्या सहा आमदारांबद्दल काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस म्हणाल्या, आज सकाळी (१३ मार्च) मला माध्यमांमधून कळले की काही आमदार राज्याबाहेर गेले आहेत. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही. १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या आमदारांना भुवनेश्वरमध्ये राहण्यासाठी काल व्हीप जारी करण्यात आला होता. सध्या आम्ही त्यांच्या संपर्कात नाही. रम्यान, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी ओडिशा काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी यापूर्वीही असेच केले आहे, क्रॉस व्होटिंगच्या भीतीमुळे त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील काँग्रेस आमदारांना बेंगळुरूच्या बाहेरील एका रिसॉर्टमध्ये त्यांना ठेवले होते.

ओडिशा राज्यसभा निवडणूक: चौथी जागा अडचणीत

ओडिशामधील एकूण आमदारांची संख्या ही 147 आहे. भाजपला ७९ आमदारांचा पाठिंबा आहे, तर बिजू जनता दलाकडे (बीजेडी) ५० आणि काँग्रेसकडे १४ आमदार आहेत. राज्यात सत्ताधारी भाजपला राज्यसभेच्या दोन जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर अपक्ष उमेदवार दिलीप रे यांनाही पाठिंबा मिळत आहे. बीजेडीला एक जागा मिळणे निश्चित मानले जात आहे. चौथ्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे मते नाहीत. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. दत्तेश्वर होता यांना जिंकण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल, तर अपक्ष उमेदवार दिलीप रे यांना विरोधी गटातील किमान आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tueday Horoscope: आज तुमचे जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद होतील, वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

SCROLL FOR NEXT