लाडक्या बहीणींना आज 34 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे आज ग्वालियरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते हे डिजिटल माध्यमातून हे पैसे लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार आसून ते 122 कोटीचे विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव शुक्रवारी (दि.13) लाडकी बहीण या संम्मेलनमध्ये सामील होणार आहे. यावेळी ते राज्यातील 1 कोटी 25 लाखापेक्षा अधिक महिलांच्या खात्यात 34 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. यासाठी तब्बल 1836 कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत, ग्वाल्हेर जिल्ह्यातील 3 लाख 2 हजार 850 महिलांच्या खात्यात अंदाजे 44 कोटी रुपये हस्तांतरित केले जातील . कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री अंदाजे १२२ कोटी रुपयांच्या ५४ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ देखील करतील. यामध्ये १९ कामांचे उद्घाटन आणि ३५ कामांचे भूमिपूजन समारंभाचा समावेश आहेत.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर, मंत्री तुलसीराम सिलावत, नारायण सिंह कुशवाह, प्रद्युमन सिंह तोमर, भरत सिंह कुशवाह, मोहन सिंह राठोड आणि दुर्गेश कुंवर सिंह जाटव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजन आणि उद्घाटन होणाऱ्या कामांमध्ये कुलैथ येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम, सांक नदीवरील पूल, कामगार विश्रामगृह, आंबेडकर धाम संग्रहालय, रस्ते बांधकाम आणि शहरी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित इतर कामांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.