वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये RAC तिकीट बंद
फक्त कन्फर्म बर्थ असलेल्यांनाच प्रवासाची परवानगी असेल
कोणताही व्हीआयपी किंवा आपत्कालीन कोटा नसणार आहे
या ट्रेनचे तिकीट नियमित ट्रेनपेक्षा थोडे जास्त असेल
वंदे भारत ट्रेनबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. ही ट्रेन लांबपल्ल्याचा रात्रीच्या प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकणार आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त कन्फर्म तिकीटच मिळेल. म्हणजे या प्रवासासाठी आरएसी (RAC) तिकीट नसेल. यामुळे आरएसीचे आणि वेटिंग लिस्टचे टेन्शन मिटणार आहे. जर तिकीट मिळाले तरच पूर्ण बर्थ मिळेल. जर मिळाले नाही तर तिकीट बुकिंग होणारच नाही.
आतापर्यंत अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन्समध्ये RAC म्हणजे एका बर्थवर दोन प्रवासी प्रवास करत होते. परंतु हा नियम वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी लागू होणार नाही. रेल्वे बोर्डाच्या मते, बुकिंग सुरू होताच फक्त उपलब्ध बर्थ विकल्या जातील. यामुळे प्रवाशांना त्यांची सीट कन्फर्म आहे की नाही याची स्पष्ट माहिती मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये कोणताही व्हीआयपी किंवा आपत्कालीन कोटा नसणार आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनाही पास घेऊन प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या ट्रेनमधुन फक्त कन्फर्म तिकीट असलेल्यांना प्रवास करता येणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे नियमित ट्रेनच्या तुलनेत थोडे जास्त असणार आहे. रेल्वेने किमान भाडे ४०० किलोमीटर निश्चित केले आहे. जरी तुम्ही त्यापेक्षा कमी प्रवास केला तरीही तुम्हाला तेवढेच भाडे द्यावे लागेल. ३ एसीचे भाडे अंदाजे २.४० रुपये प्रति किलोमीटर आहे. २ एसीचे भाडे प्रति किलोमीटर ३.१० रुपये आणि १ एसीचे भाडे प्रति किलोमीटर ३.८० रुपये असेल. एसी क्लाससाठी देखील जीएसटी लागू असणार आहे.
प्रवाशांच्या बेड लिननचे पूर्णपणे अपग्रेडेशन केले जाईल. ज्यामध्ये ब्लँकेट कव्हरचा समावेश असेल आणि त्याची गुणवत्ता नियमित गाड्यांपेक्षा खूपच चांगली असेल. कर्मचाऱ्यांच्या गणवेशात भारतीय संस्कृती आणि परंपरा प्रतिबिंबित होतील ज्यामुळे ट्रेनमधून प्रवास करताना भारतीय अनुभव वाढेल. या ट्रेनमध्ये प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा, आरामदायी प्रवास आणि भारतीय संस्कृतीचा अनुभव घेता येईल. या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना जेवणामध्ये स्थानिक चवींचाही आस्वाद घेता येईल. या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना समान नियमांनुसार प्रवासाचा अनुभव घेता यावा हे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.