बिहारमध्ये मोठा राजकीय बदल झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी आज 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
पाटणा येथील राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यात सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचा समावेश आहे.
राजभवनात रविवारी सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा सुरू झाला. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी आधी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नितीश यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये दोघांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. (Latest Marathi News)
सम्राट चौधरी हे सध्या भाजपचे बिहार अध्यक्ष आहेत. नितीश कुमार महाआघाडीत सामील झाल्यानंतर भाजपने त्यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली होती. गेल्या वर्षभरात ते नितीश कुमारांच्या विरोधात सातत्याने राजकारण करत होते. आता त्यांना नितीश यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आणि माजी सभापती विजय सिन्हा यांनाही उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्या विरोधात ते रस्त्यावरून संसदेपर्यंत आवाज उठवत होते. आता ते नितीश कुमार यांच्यासोबत काम करणार आहेत.
याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जेडीयू नेते विजय चौधरी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महाआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी होती. ते बिहार सरकारमधील जेडीयूचे नंबर दोनचे नेते मानले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.