Prashant Kumar News: लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार पुन्हा आश्चर्याचकीत करतील; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

Prashant Kishor News: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रविवारी नीतीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेवर मोठी भविष्यवाणी केली आहे. भाजप आणि जनता दल यूनाइटेड युती लोकसभा निवडणुकीनंतर टिकणार नाही, असं भाकीत प्रशांत किशोर यांनी केलं आहे.
Prashant Kumar News
Prashant Kumar NewsSaam tv
Published On

Prashant Kishor News:

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रविवारी नीतीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेवर मोठी भविष्यवाणी केली आहे. भाजप आणि जनता दल यूनाइटेड युती लोकसभा निवडणुकीनंतर टिकणार नाही, असं भाकीत प्रशांत किशोर यांनी केलं आहे. २०२५ साली होणाऱ्या बिहार विधानसभेआधी नितीश कुमार पुन्हा एकदा यू-टर्न घेतील, असं प्रशांत किशोर यांनी पुढे म्हटलं आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, 'बिहारमध्ये लोकसभेचे एकूण ४० मतदारसंघ आहेत. २०१९ साली बिहारमध्ये भाजप आणि जदयू युतीने ३९ जागा जिंकल्या होत्या. २०२४ साली भाजप बिहारमधील लोकसभेच्या जागा गमावू इच्छित नाही. त्यामुळे नीतीश कुमार यांचं एनडीएमध्ये स्वागत केलं आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prashant Kumar News
Mann Ki Baat: 'देव ते देश, राम ते राष्ट्र', PM मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी साधला संवाद

'भाजपला त्यांच्या बिहारमधील वाढत्या प्रभावाविषयी विश्वास आहे. भाजपला असं वाटतंय की, ते विधानसभा निवडणुकीत मोठी भूमिका बजावू शकतात. नितीश कुमार यांना भीती आहे की, ते राष्ट्रीय जनता दलासबोत गेलं तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकता येणार नाही, असे प्रशांत किशोर म्हणाले.

Prashant Kumar News
OBC Reservation: अध्यादेशावरून ओबीसी समाज सरकारवर नाराज? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमारांचा पुन्हा यूटर्न?

२०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ७४ जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रीय जनता दलाला ७५ जागा मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे जनता दल यूनाइटेडला ४३ जागा मिळाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com