मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशावरून ओबीस समाज नाराज सरकारवर नाराज असल्याच चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आत त्यांच्या शासकीय निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासायचं काम सुरू आहे. यावर आक्षेप सुद्धा मागवले आहे. त्याची सुनावणी होईल. त्यानंतर अधिसूचना मान्य होईल. कुणबी असूनही प्रमाणपत्र न मिळणे यात सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. जे मुळात कुणबी समाजात होते त्या लोकांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राज्य सरकार आणि पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, पण ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात येणार आहे. विरोधी पक्षाचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत. प्रत्यक्षात नोंदी होत्या, मात्र प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांना न्याय देण्याची भूमिका असल्याचं ते म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे सातत्याने मराठा समाज आणि मनोज जरांगेंविरोधात भूमिका घेतायेत. त्यामुळे ते भाजपच्या जवळचे असल्याची चर्चा आहे, मात्र बावनकुळे यांनी, सदावर्ते यांच्यासोबत भाजपचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा कुठे भेट झाली हे स्पष्ट केलं आहे. एखाद्यावेळी भूमिका विरुद्ध गेल्यावर भाजपला बदनाम करण्याचं काम होत असते, मनसेने केलेल्या आरोपांवर त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
भारत देशाची महासत्ता बनणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा संकल्प आहे. त्या संकल्पाला साथ देण्यासाठी अजित पवार, एकनाथ शिंदे, नितीश कुमार यांच्यासारखे नेते मोदींसोबत येत असतील तर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आणखी कोणी यायला इच्छुक असल्यास त्यांचंही स्वागत असल्याच ते म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.