nitesh kumar Saam tv
देश विदेश

Bihar Election Result : बिहारचा मुख्यमंत्री ठरला! नितीश कुमारच होणार CM, एनडीएच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

Bihar Election Result update : बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

बिहारमध्ये भाजप मोठा पक्ष ठरतोय

एनडीएच्या घटक पक्षाची जोरदार मुंसडी

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार, जीतन राम मांझी यांची पसंती

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दल जोरदार मुसंडी मारताना दिसत आहेत. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरताना दिसतोय. बिहार विधानसभा निडवणुकीत भाजप, जनता दल, लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवारांना जोरदार यश पाहायला मिळत आहे. बिहारमधील लोकांचा कल एनडीएच्या बाजूने झुकल्याने आता बिहारच्या मुख्यमंत्रिदाबाबत चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेदरम्यान 'एनडीए'मधील ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत साडेतीन वाजताच्या मतमोजणीत भाजप ९४, जनता दल युनायटेड ८४, लोक जनशक्ती पार्टी १९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर आरजेडी २५, AIMIM ५ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होताना दिसत आहे. दुसरीकडे जनता दल युनायडेट पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे. यानंतर आता सर्वांचं लक्ष मुख्यमंत्रि‍पदावर लागलं आहे. आता 'एनडीए'कडून मुख्यमंत्रि‍पदावर दावे केले आहेत.

हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांनीही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर जनता दल युनायडेटने 'न भूतो न भविष्य... नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते. पुढेही राहतील', अशी पोस्ट केली. मात्र, जनता दल युनायटेडने काही मिनिटांत ती पोस्ट डिलीट केली. तर एका समर्थकाने पटना येथील पक्षाच्या मुख्यालयासमोर पोस्टरमध्ये नितीश कुमार यांच्या फोटोसहित 'टायगर अभी जिंदा है' असा बॅनर छापला आहे.

दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांनीही मुख्यमंत्रि‍पदावर भाष्य केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री हे बैठकीनंतर ठरवले जातील, असं त्यांनी म्हटलं आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत नितीश कुमार यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. बिहारमध्ये भाजप मोठा भावाच्या भूमिकेत दिसत आहे. भाजपने ९० हून अधिका जागांवर मुसंडी मारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT