KC Tyagi resigns from JDU, dealing a significant political blow to Bihar Chief Minister Nitish Kumar Saam Tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीयाने दिला तडकाफडकी राजीनामा, पक्षाला भगदाड

KC Tyagi Resignation Reason From JDU: जेडीयूचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी अचानक राजीनामा दिल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला असून पक्षात भगदाड पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Omkar Sonawane

राज्यसभा निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तिय मानले जाणारे के.सी त्यागी यांनी JDU पक्षाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी भविष्यातील राजकीय प्लान देखील सांगितला. त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले की, 22 मार्चला मी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार असून पुढील राजकीय रणनिती ठरवणार आहे. 2003 ला मी JDU मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी जॉर्ज त्या वेळी जॉर्ज फर्नांडिस अध्यक्ष होते आणि मी सरचिटणीस होतो.

मी शरद यादव आणि नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखालीही काम केले. मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता आणि राजकीय सल्लागारही होतो. आता पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम संपली आहे आणि मी पक्षात पुन्हा सामील झालेलो नाही. नितीश कुमार यांच्याबद्दलचा माझा आदर कधीही कमी होणार नाही.

केसी त्यागींनी सांगितला आगामी प्लान

केसी त्यागी यांनी पुढे लिहिले, माझ्या काही राजकीय सहकाऱ्यांनी, समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी २२ मार्च रोजी एका सभेचे आयोजन केले आहे. या सभेत देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल. मी लवकरच माझ्या भविष्यातील रणनीतीबद्दल निर्णय घेईन. महत्वाचे म्हणजे केसी त्यागी मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशात त्यांना माणनारा मोठा वर्ग आहे. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, त्यागी आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करू शकतात. माध्यमांच्या वृत्तांनुसार, त्यागी यांना आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे.

के.सी. त्यागी हे जेडीयूचे एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानले जात होते. ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचेही मानले जात होते. त्यांनी प्रत्येक व्यासपीठावर जेडीयूच्या बाजूने जोरदारपणे भूमिका मांडली. यावर्षी त्यागी यांनी नितीश कुमार यांच्यासाठी भारतरत्नची मागणीही केली होती आणि पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले होते. मात्र, जेडीयूने बऱ्याच काळापासून त्यांना दूर ठेवले होते. यानंतर केसी त्यागी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: e-KYC ची मुदत 30 एप्रिलला संपली; 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

SCROLL FOR NEXT