

मुंबईतील साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
मुंबई महापालिकेने सहाय्यक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले.
नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित
गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसाने मुंबईची दैना केली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे दुर्दैवी घटना घडल्या आहेत.मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या बस झाड पडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच साकीनाका येथे एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ ही घटना घडली. (Mumbai Rain Horror: BMC Suspends Four Officers Over Sakinaka Manhole Death)
या घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेने सहाय्यक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा मृत्यू झाला.
या घटनेवरून मुंबई महापालिका टीकेच्या धनी बनली आहे. विरोधकांडून हल्लाबोल केला जातोय. दरम्यान एका खासगी कंत्राटदाराकडून सुरू असलेल्या देखभाल कामादरम्यान मॅनहोलचे झाकण उघडे राहिले होते. त्याचवेळी मोबाईलवर बोलत बोलत जाताना शेख हे त्या मॅनहोलमध्ये पडले.
दुपारी १२.२६ वाजता अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर लागलीच बचावकार्य सुरू करण्यात आले. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शिडीच्या साहाय्याने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी त्यांची छत्री आणि चप्पलच सापडली. पावसाच्या पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने ते कोणत्या दिशेने वाहून गेले, हे सुरुवातीला समजू शकले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाच्या शोधमोहीमेदरम्यान संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
साकीनाका घटनेप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त धनाजी हर्लेकर (एल वार्ड), सहाय्यक अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौगुले आणि सहाय्यक अभियंता उत्तम पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. याविषयीचा आदेश महापालिकेकडून जारी करण्यात आला आहे.
दरम्यान मान्सूनपूर्व बैठकांमध्ये वारंवार मॅनहोल बाबत निर्देश देण्यात आले होते. नाल्यांवरील मॅनहोल सुरक्षित ठेवण्यात यावे. तरीही निष्काळजीपणे काम केले गेले असल्याचे आदेशात म्हटलंय. या घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिकेकडून चार सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. घटनेची सखोल चौकशी ही समिती करणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजनाही सुचवल्या जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.