Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं थैमान! मुंबई-पुणे आणि ठाण्यासाठी पुढचे ३ तास महत्वाचे, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Weather Upate News : महाराष्ट्रात पालघर आणि पुणे घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: RED WARNING FOR PALGHAR AND PUNE GHAT AREAS, ORANGE ALERT IN MUMBAI AND KONKAN
MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: RED WARNING FOR PALGHAR AND PUNE GHAT AREAS, ORANGE ALERT IN MUMBAI AND KONKANSaam tv
Published On
Summary
  • पालघर आणि पुणे घाटमाथा भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट

  • मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकणातील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट

  • रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना पावसामुळे सुट्टी

Maharashtra Weather Update Today News राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान राज्यात गेले ३ दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा नागरिकांना मोठा फटका बसला आहे. रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. मुंबई, पालघर,ठाणे परिसरात पुढील ३ तास महत्त्वाचे असून विशेषतः कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथा भागात पुढील २४ तासांत अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पालघर आणि पुणे (Pune Rain Alert) जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. डोंगराळ भागांमध्ये दरड कोसळणे, रस्ते वाहतुकीवर परिणाम होणे आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. याशिवाय ठाणे, मुंबई (Mumbai Rain Alert) , रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: RED WARNING FOR PALGHAR AND PUNE GHAT AREAS, ORANGE ALERT IN MUMBAI AND KONKAN
Office Hacks : पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपडे भिजले तर काय कराल? 'या' टिप्स करा फॉलो

विदर्भातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला असून विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: RED WARNING FOR PALGHAR AND PUNE GHAT AREAS, ORANGE ALERT IN MUMBAI AND KONKAN
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

(Monsoon Update )दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तर भारतातील प्रगती सुरूच आहे. मंगळवारी मॉन्सूनने उत्तर अरबी समुद्र, संपूर्ण हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर तसेच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना आणि पंजाबच्या काही भागांमध्ये पुढे वाटचाल केली. पुढील दोन दिवसांत दिल्ली आणि राजस्थानसह देशाच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे देशभरात पावसाचे प्रमाण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com