भाजपला अखेर राष्ट्रीय अध्यक्ष मिळाले
नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली
नितीन नबीन हे भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत
पीएम मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले
भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळाले. भाजपने १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड केली. मंगळवारी भाजप मुख्यालयात याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. नितीन नबीन यांची निवड होताच ढोल-ताशांच्या गजरात भाजप मुख्यालयाबाहेर उत्सव साजरा करण्यात आला.
४५ वर्षीय नितीन नबीन हे भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. त्यांच्याआधी अमित शहा यांची वयाच्या ४९ व्या वर्षी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. सोमवारी भाजप मुख्यालयात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली. १४ डिसेंबर २०२५ रोजी नितीन यांना पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष बनवण्यात आले होते.
सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन नबीन यांचे पीएम मोदी यांनी अभिनंदन केले. नितीन नबीन यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापूर्वी नितीन नबीन यांनी दिल्लीतील विविध मंदिरांना भेट देत दर्शन घेतले. त्यांनी गुरुद्वारा बांगला साहिब, झंडेवालन मंदिर, वाल्मिकी मंदिर आणि कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिराला भेट दिली आणि पूजा केली.
पीएम मोदी यांनी नितीन नबीन यांचे कौतुक करत सांगितले की, 'भाजप हा असा पक्ष आहे जिथे लोकांना वाटेल की मोदीजी इतक्या लहान वयात मुख्यमंत्री झाले. ते सरकारचे प्रमुख झाले आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पण मला वाटते की नितीनजी माझे बॉस आहेत मी एक कार्यकर्ता आहे.'
तसंच, पीएम मोदी म्हणाले की, 'नितीन नबीन हे आपल्या सर्वांचे अध्यक्ष आहेत. त्यांची जबाबदारी फक्त भाजपचे व्यवस्थापन करणे नाही तर एनडीएशी समन्वय साधणे देखील आहे. नितीन जी यांच्या संपर्कात आलेला कोणीही त्यांच्या साधेपणा आणि सहजतेबद्दल बोलतो. भाजप युवा मोर्चाचे नेतृत्व करणे असो किंवा राज्य प्रभारी म्हणून काम करणे असो नितीनजी यांनी त्यांनी घेतलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण केली आहे.'
नितीन नबीन यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे वरिष्ठ नेते होते. ते पाटणा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले होते. २३ मे १९८० रोजी रांची येथे नितीन नबीन यांचा जन्म झाला होता. त्यांनी सीबीएसई शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि पुढचे शिक्षण त्यांनी दिल्लीतून पूर्ण केले. दीपमाला श्रीवास्तव या नितीन नबीन यांच्या पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.