PM Narendra Modi : महायुतीच्या विजयानंतर PM मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा, म्हणाले - 'महाराष्ट्र विकासाच्या...'

PM Narendra Modi Congratulated Mahayuti For Maharashtra Civic Poll Post : महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जनतेचे आभार मानले असून महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठाम असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात २ डिसेंबर रोजी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा काल निकाल लागला. राज्यात सर्वत्र जनतेने महायुतीच्या बाजूने कल दिला असून मिळालेल्या यशाबाबत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल राज्यातील जनतेचं ऋण व्यक्त केले आहेत.

मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, "महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.​भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com