New Vande Bharat Train Features Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारतमध्ये गरम पाण्याने अंघोळही करता येणार, नवी ट्रेन कशी आहे? जाणून घ्या वैशिष्ट्ये

New Vande Bharat Train Features: देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून ती लवकरच आपल्या सेवेमध्ये येणार आहे.

Priya More

वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा असे प्रत्येकाला वाटते. या ट्रेनमधून प्रवास करणं खूपच आरामदायी आहेच पण हा प्रवास अविस्मरणीय असतो. या ट्रेनमध्ये प्रवाशांना सर्व सोयी सुविधा मिळतात. तुम्ही आतापर्यंत वंदे भारतने प्रवास केला असेल. यामध्ये तुम्हाला बसून प्रवास करता आला. पण आता वंदे भारतमधून प्रवास करताना तुम्हाला झोपता आणि अंघोळ देखील करता येणार आहे. देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून ती लवकरच आपल्या सेवेमध्ये येणार आहे. या ट्रेनच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या रेल्वे सुविधांचा अनुभव घेता येत आहे. या ट्रेनमधून जो कोणी प्रवास करतो तो हा प्रवास विसरत नाही आणि या ट्रेनचे कौतुक करतो. अशातच आता मोदी सरकार लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करत आहे. नुकताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारतच्या पहिल्या मॉडेलची झलक दाखवली. या नव्या वंदे भारत ट्रेनला पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

बंगळुरूच्या बीईएमएल कारखान्यामध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्यात आली आहे. काही दिवसांमध्येच ही ट्रेन कारखान्यातून बाहेर काढण्यात येणार आहे. सुरूवातीला १० दिवस वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतर्गत चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर दोन महिने रूळावर या ट्रेनची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर ही ट्रेन लाँच करत नागरिकांच्या सेवेमध्ये आणण्यात येणार आहे.

ट्रेनचे खास वैशिष्ट्ये -

वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील सर्वच कोच स्लीपर असतील. ८०० ते १२०० किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. रात्री १० वाजता प्रवासी या ट्रेनमधील बसतील आणि सकाळी ते त्यांच्या गंतव्यस्थळी पोहचतील. सर्वसामान्यांना परवडेल असा विचार करून ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट राजधानी एक्स्प्रेस ऐवढेच असणार आहे.

नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये संतुलन आणि स्थिरतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेनच्या आतमध्ये प्रवाशांना बाहेरचा आवाज येणार नाही. नवीन कपलर तंत्रज्ञानामुळे ट्रेनचे वजन कमी आहे. ट्रेनमधील प्रत्येक डबे आणि टॉयलेट अपग्रेड करण्यात आले आहे. यासोबतच ट्रेनमध्ये अनेक नवे सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबीन देण्यात आली आहे.

अशी असेल ट्रेन -

वंदे भारत स्लीपर ट्रेन ही १६ डब्यांची असणार आहे. १ एसी फर्स्ट क्लास २४ बर्थ, ४ एसी सेकंड क्सास १८८ बर्थ, ११ एसी थर्ड क्लास ६११ बर्थ असणार आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेन ताशी १८० किलोमीटर या सर्वात जास्त वेगाने धावेल. ताशी १६० किमी कमाल वेग मर्यादा असेल. या ट्रेनने राजधानी एक्स्प्रेसपेक्षा जास्त वेगवान प्रवास करता येणार आहे.

ट्रेनमध्ये काय सुविधा?

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये सीटवर यूएसबी चार्जिंग, रिडिंग लाईटची सोय, मॉड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सीसीटीव्ही, एसी फर्स्ट क्लासच्या कोचमध्ये गरम पाण्याचा शॉवर असेल. तसंच, वरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची नवी रचना करण्यात आली आहे. प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी जास्त जागा देण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळा विशेष बर्थ देण्यात आला आहे. ऑक्सिजन लेव्हल लक्ष ठेवणारी यंत्रणा या ट्रेनमध्ये असेल. लोको पायलटसाठी टॉयलेट देण्यात आले आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना कमी झटके बसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT