Vande Bharat Train: भारतीय रेल्वेचा तगडा प्लॅन; वंदे भारत स्लीपर-बुलेट ट्रेन, चिनाब ब्रिजसह बरंच काही

Indian Railway Project: भारतीय रेल्वेने १०० दिवसांचा एक मोठा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये वंदे भारत स्लीपर, बुलेट ट्रेन, चिनाब ब्रिज आणि जेके रेल प्रोजेक्टचा समावेश आहे.
Vande Bharat Train
Vande Bharat TrainSaam Tv

Indian Railways 100 Day Plan

भारतीय रेल्वे (Indian Railway) नवीन सरकारसाठी 100 दिवसांचा मोठा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या रोलआउटसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरमधील यूएसबीआरएल प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन, चिनाब रेल्वे पूल आणि बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी रोलिंग स्टॉकची खरेदी करण्याचा समावेश (Vande Bharat Train) आहे. (Latest Marathi News)

भारतीय रेल्वेने नवीन सरकारच्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये, वंदे भारत स्लीपर, बुलेट ट्रेन, जम्मू आणि काश्मीरमधील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आखली आहे, असं इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अधिकाऱ्यांना सांगितलं (Indian Railways 100 Day Plan) आहे. त्यांनी नमूद केलं आहे की, शंभर दिवसांच्या या योजनेत ऑगस्ट 2026 पर्यंत बुलेट ट्रेनच्या चाचणीसाठी रोलिंग स्टॉक खरेदी प्रक्रियेला अंतिम रूप देण्याचा समावेश आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नईची इंटिग्रल कोच फॅक्टरी वंदे भारत एक्स्प्रेसचे स्लीपर व्हेरियंट्स रात्रभर लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करत आहे. या नवीन ट्रेन लांबच्या प्रवासामध्ये प्रवाशांना अधिक सोयीस्कर असणार (Indian Railway Project) आहेत.

एक वंदे भारत स्लीपर ट्रेन सध्या बेंगळुरूमध्ये तयार होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोच शेलची पाहणी केली होती. टाईम्स ऑफ इंडियाने नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनचं पहिलं प्रस्तावित रूप समोर (Vande Bharat) आणलं आहे. सरकारने रोलिंग स्टॉक उत्पादनासाठीचे बजेट 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवलं आहे. याव्यतिरिक्त याव्यतिरिक्त सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत दोनशे स्लीपर वंदे भारत ट्रेनवर काम सुरू आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat Trains: महाराष्ट्रासह देशात आणखी १० वंदे भारत ट्रेन धावणार; कसा असेल मार्ग?

प्रमुख बाब म्हणजे उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंकचा उद्देश काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणं आहे. हा 37 हजार 012 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे (Vande Bharat Sleeper Bullet Train) जम्मू ते श्रीनगर हा रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे.चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पूर्ण झाला आहे. चिनाब रेल्वे पुलाला जोडण्यासाठी काही बोगद्यांचं काम सुरू आहे.

अहमदाबाद-मुंबई हाय-स्पीड रेल्वे खरेदीची योजना (Jk Rail Project) नवीन सरकारच्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या 100 दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. ही भारतातील पहिली बुलेट ट्रेन आहे. हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून 40 हजार 625 कोटी रुपयांचं कर्ज मिळालं आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेन आता परदेशातही धावणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितला प्लान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com