Vande Bharat Trains: महाराष्ट्रासह देशात आणखी १० वंदे भारत ट्रेन धावणार; कसा असेल मार्ग?

Vande Bharat Train Route: महाराष्ट्रासह देशात आणखी १० वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. त्यांचा मार्ग कसा असणार ते आपण जाणून घेऊ या.
Vande Bharat Trains
Vande Bharat TrainsYandex
Published On

Vande Bharat Train Update

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (12 मार्च) अहमदाबाद येथून अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये 10 नवीन वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे. सध्या भारतीय रेल्वे 41 वंदे भारत एक्सप्रेस चालवत (Indian Railway) आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील हेही उपस्थित होते. (Latest Marathi News)

भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेस सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज ( Vande Bharat Trains) आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या सर्व आधुनिक सेवा आहेत. यामध्ये 8 किंवा 16 कोच आहेत. या ट्रेनमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन वंदे भारत ट्रेनचा मार्ग

पहिली वंदे भारत ट्रेन अहमदाबादपासून मुंबई सेंट्रलपर्यंत आहे. दुसरी वंदे भारत ट्रेन सिकंदराबाद ते विशाखापट्टणम अशी आहे. तिसरी वंदे भारत ट्रेन म्हैसूर ते डॉ. एमजीआर सेंट्रल (चेन्नई) अशी (Vande Bharat Train Route) आहे. चौथी वंदे भारत ट्रेन पाटणा ते लखनौपर्यंत आहे. पाचवी वंदे भारत ट्रेन न्यू जलपाईगुडी ते पाटणा अशी आहे. सहावी वंदे भारत ट्रेन पुरी ते विशाखापट्टणमपर्यंत आहे. सातवी लखनौ ते डेहराडून आहे. आठवी ट्रेन कलबुर्गी ते सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू अशी आहे. नववी ट्रेन रांची ते वाराणसीपर्यंत आहे. दहावी ट्रेन खजुराहो ते दिल्ली (निजामुद्दीन) अशी आहे.

गोरखपूर ते लखनऊ वंदे भारत ट्रेन आता प्रयागराजपर्यंत विस्तारित करण्यात येत आहे. तिरुअनंतपुरम ते कासरगोड वंदे भारत ट्रेन आता मंगळुरूपर्यंत विस्तारित करण्यात येत (Vande Bharat Train Update) आहे. अहमदाबाद ते जामनगर वंदे भारत ट्रेन आता द्वारकापर्यंत विस्तारित करण्यात येत आहे. अजमेर ते दिल्ली सराई रोहिल्ला वंदे भारत ट्रेन चंदिगडपर्यंत विस्तारित करण्यात येत आहे.

Vande Bharat Trains
Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेन आता परदेशातही धावणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितला प्लान

वंदे भारतमध्ये कोणत्या सुविधा आहेत?

वंदे भारत ट्रेन आधुनिक सुविधांनी सुसज्ज (Train Routes) आहे. यामध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर अशा अनेक सुविधा आहेत. वंदे भारत ट्रेन नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

Vande Bharat Trains
Vande Bharat Train: भाविकांसाठी खुशखबर! लवकरच शेगावसाठी धावणार ‘वंदे भारत ट्रेन’, पाहा कसा असेल मार्ग?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com