Pune News: पुणेकरांना मिळणार आणखी दोन वंदे भारत ट्रेन, या लोकांना होणार फायदा

Pune Vande Bharat Express News: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून आणखी दोन नवीन वंदे भारत गाड्या सुरू होणार आहे.
Pune Vande Bharat Express News
Pune Vande Bharat Express NewsANI
Published On

Pune Vande Bharat Express News:

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून आणखी दोन नवीन वंदे भारत गाड्या सुरू होणार आहे. या दोन नव्या गाड्या पुण्याला वडोदरा आणि सिकंदराबादशी जोडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ज्यामध्ये या दोन गाड्यांचा समावेश आहे.

यातच पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई ते गांधीनगर दरम्यान सुरू झाली होती. त्यानंतर मुंबई - पुणे - सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई- गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करण्यात आल्या. आता देशात आणखी 10 वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून त्यापैकी दोन महाराष्ट्रातून चालवण्यात येणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Vande Bharat Express News
Pune Metro: पुणेकरांची मेट्रोला पसंती, रुबी हॉल ते रामवाडी प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ

पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव अशा दोन वंदे भारत गाड्या सुरु होऊ शकतात

मिळालाय माहितीनुसार, देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठीही वंदे भारत गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. देशातील अनेक ठिकाणांहून वंदे भारत गाड्या अयोध्या रेल्वे स्थानकावर दाखल होत आहेत. राज्यात वंदे भारत ट्रेन शिर्डी चालवली जात आहे. आता पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव अशा दोन वंदे भारत गाड्या सुरू होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

स्लीपर वंदे भारत ट्रेन

अमृत ​​भारत आणि वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जनही लॉन्च करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या कार बॉडी स्ट्रक्चरचे उद्घाटन केले. बेंगळुरूमध्ये ऑक्टोबर 2023 पासून वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर प्रोटोटाइपचे बांधकाम सुरू आहे. राजधानी एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असं बोललं जात आहे.

Pune Vande Bharat Express News
Badlapur Metro Update : बदलापूर ते नवी मुंबई मेट्रोने जोडणार, मेट्रोचं जाळं कसं असणार?

पुणेकरांना 3 वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येईल

सध्या बिलासपूर-नागपूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-गोवा या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर-मुंबई वंदे भारत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यातच सध्या मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत ट्रेन पुणे मार्गे धावते, तर पुणे-वडोदरा ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. प्रस्तावित मुंबई-कोल्हापूर वंदे भारत देखील पुण्यामार्गे चालवण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांना आता तीन वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com