Pune Metro: पुणेकरांची मेट्रोला पसंती, रुबी हॉल ते रामवाडी प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ

Pune Metro Latest Update: वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांना मेट्रो सुरु झाल्याने आता मोठा दिलासा मिळाला आहे. 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
Pune Metro Latest Update
Pune Metro Latest UpdateSaam Tv
Published On

Pune Metro Latest Update News:

वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांना मेट्रो सुरु झाल्याने आता मोठा दिलासा मिळाला आहे. 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यातच मेट्रोने प्रवास करण्यास पुणेकर आपली पसंती दर्शवत असल्याची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रोने याबाबत आकडेवारी जारी केली आहे.

पुणे मेट्रोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार दिवसांत रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावर 52,000 हून अधिक प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 मार्च रोजी या मेट्रोला हिरवा कंदील दाखवला होता. यातच स्वारगेट ते पिंपरी मार्गाच्या निगडीपर्यंत विस्तारीकरणाचे भूमिपूजनही मोदींनी केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Metro Latest Update
National News: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढला, अमेरिकेसारखे देशही सल्ला घेतात: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

याबाबत माहिती देताना पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 6 आणि 7 मार्च रोजी या मार्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. उद्घाटनानंतर रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावर तब्बल 52,763 प्रवाशांनी प्रवास केला. पुणे मेट्रोने या दिवसात सुमारे 4.33 लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हा मार्ग पूर्वेला रामवाडी आणि पश्चिमेला कोथरूडच्या पलीकडे पीसीएमसीला जोडतो.”

वनाज ते रामवाडी या 15 किलोमीटरच्या मार्गावर 15 स्थानके आहेत. रुबी हॉल ते रामवाडी मार्गावर बंड गार्डन, येरवडा आणि कल्याणीनगर स्थानक आहे. पंतप्रधानांनी 6 मार्च 2022 रोजी 7 किमीच्या पीसीएमसी ते फुगेवाडी आणि 5 किमीच्या वनाझ ते गरवारे मार्गाचे उद्घाटन केले. नंतर त्यांनी 1 ऑगस्ट 2023 रोजी 4.75 किमीच्या गरवारे ते रुबी हॉल आणि 6.91 किमी लांबीच्या फुगेवाडी ते नागरी न्यायालय या मार्गांचे उद्घाटन केले होते.  (Latest Marathi News)

Pune Metro Latest Update
Jogeshwari News: रवींद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश! ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, फोटोला फासले काळे; पाहा VIDEO

रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज 15,000 हून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत. पीसीएमसी ते निगडी मार्गाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. हा विस्तार 2.5 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिते पुणे मेट्रोचे अधिकारी डॉ. हेमंत सोनवणे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com