National News: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढला, अमेरिकेसारखे देशही सल्ला घेतात: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Rajnath Singh News: जागतिक दर्जाच्या नेत्यांची आणि लोकांची भारताबद्दल खूप सकारात्मक धारणा आहे आणि देश आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने प्रगती करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
Rajnath Singh
Rajnath Singh Saam Tv
Published On

Rajnath Singh News:

जागतिक दर्जाच्या नेत्यांची आणि लोकांची भारताबद्दल खूप सकारात्मक धारणा आहे आणि देश आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने प्रगती करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. रविवारी लखनऊमध्ये 'कायस्थ परिवार अभिनंदन कार्यक्रमा'ला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, तुम्ही लोक कदाचित परदेशात गेले असतील, आजची परिस्थिती पूर्वीच्या दिवसांपेक्षा खूप वेगळी आहे. याआधी आपण परदेश दौऱ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काही सूचना दिल्या तर त्या गांभीर्याने घेतल्या जात नव्हत्या. मात्र आता आपण काही बोललो तर अमेरिकेसारखा देशही आपले ऐकतो आणि आपल्या सूचनांकडे लक्ष देतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajnath Singh
Jogeshwari News: रवींद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश! ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, फोटोला फासले काळे; पाहा VIDEO

'लखनौमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती स्थळावरील काम पूर्ण'

सिंह म्हणाले की, ''लखनौमधील ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती स्थळाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि लवकरच त्याच्या एका युनिटचे उद्घाटन केले जाईल. यामुळे राज्यात लाखो नवीन रोजगार निर्माण होतील.''

ते म्हणाले की, उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतात कोणीही कल्पना केली नसेल की येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती युनिट तयार केले जाईल. मात्र आज ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती स्थळावरील निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हे युनिट राज्यातील विविध लोकांना नोकऱ्याही देईल.

Rajnath Singh
108MP कॅमेरा अन् 16GB RAM असलेला OnePlus फोन झाला स्वस्त; 16999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या इतर देशांना निर्यात करण्याबाबत बोलताना संरक्षण मंत्री सिंह म्हणाले की, हे जाणून तुम्हाला आनंद होईल की, आम्ही इतर देशांनाही ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यात सुरू केली आहे. फिलीपिन्सने आमच्याकडून क्षेपणास्त्रे मागितली आहेत. आता आपली क्षेपणास्त्रे परदेशात निर्यात केली जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com