108MP कॅमेरा अन् 16GB RAM असलेला OnePlus फोन झाला स्वस्त; 16999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

OnePlus Nord CE 3 Lite 5G: तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G
OnePlus Nord CE 3 Lite 5GSaam Tv
Published On

OnePlus Nord CE 3 Lite 5G:

तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी OnePlus चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite 5G आता आणखी स्वस्तात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

हा फोन Amazon कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. OnePlus च्या या स्वस्त फोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सेलचा दमदार कॅमेरा मिळणार आहे. फक्त पॉवरफुल कॅमेराच नाही तर फोनमध्ये हेवी रॅम आणि फास्ट चार्जिंग बॅटरी देखील आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

OnePlus Nord CE 3 Lite 5G
84 दिवसांसाठी मोफत पाहता येणार Netflix, काय आहे ऑफर जाणून घ्या

रॅम आणि स्टोरेजनुसार हा फोन दोन प्रकारात लॉन्च करण्यात आला होता. लॉन्चच्या वेळी OnePlus Nord CE 3 Lite 5G (8GB+128GB) च्या बेस व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आणि 8GB+256GB ची किंमत 21,999 रुपये होती.  (Latest Marathi News)

सध्या फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 17,999 रुपयांना आणि 256GB व्हेरिएंट 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. Amazon काही निवडक बँक कार्डांवर 1,000 रुपयांची बँक सूट देत आहे. बँक ऑफरसह फोनची किंमत 128GB व्हेरिएंटसाठी 16,999 रुपये आणि 256GB व्हेरिएंटसाठी 18,999 रुपये झाली आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G
Ayushman Card: आयुष्मान कार्डधारकांना कोणत्या रुग्णालयात मिळू शकतात मोफत उपचार? जाणून घ्या

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्पेसिफिकेशन

रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो – 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज. फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅमसाठी सपोर्ट देखील आहे. जो फोनमधील एकूण रॅम 16GB वर नेतो. फोनमध्ये 6.72-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तीन रियर कॅमेरे (108MP+2MP+2MP) आणि सेल्फीसाठी पुढील बाजूस 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे. फोन Qualcomm Snapdragon 695G प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि OxygenOS वर आधारित Android 13 वर काम करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com