Prajwal Revanna : मोठी बातमी! प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक; एसआयटी पथकाने ठोकल्या बेड्या

Prajwal Revanna Arrest : प्रज्ज्वल रेवन्नाला एसआयटी पथकाने बंगळुरू विमानतळावरून अटक केली आहे. आज दुपारपर्यंत त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
मोठी बातमी! प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक;  एसआयटी पथकाने ठोकल्या बेड्या
Prajwal Revanna arrestSaam TV
Published On

कर्नाटक सेक्स स्कँडलप्रकरणी एसआयटीच्या पथकाने जेडीसएसचे निलंबित नेते प्रज्ज्वल रेवण्णा याला अखेर अटक करण्यात आली आहे. एसआयटी पथकाने बंगळुरू विमानतळावरून त्याला ताब्यात घेतलं आहे. आजच प्रज्ज्वल रेवण्णाला कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात कोर्ट नेमका काय निर्णय देतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मोठी बातमी! प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक;  एसआयटी पथकाने ठोकल्या बेड्या
Azam khan News : सपा नेते आझम खान यांना १० वर्षांची शिक्षा; १४ लाखांचा दंड, काय आहे प्रकरण?

प्रज्वल रेवण्णा भारतात येणार अशी माहिती इंटरपोलने एसआयटी पथकाला दिली होती. यानंतर पथकाने बंगळुरू विमानतळावर अटकेसाठी पूर्वतयारी करून ठेवली होती. शुक्रवारी म्हणजेच ३१ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास प्रज्जवल रेवण्णाचं विमान बंगळुरूत विमानतळावर दाखल झालं.

प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच एसआयटी पथकाने त्याच्यावर अटकेची कारवाई केली. सध्या रेवण्णा एसआयटी पथकाच्या ताब्यात असून आज दुपारपर्यंत त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. बुधवारी प्रज्वल रेवण्णानं अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता.

मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रज्वल रेवण्णाचे महिला अत्याचाराचे व्हिडीओ सार्वजनिक झाले होते. यानंतर त्याच्याविरोधात अत्याचाराच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. प्राथमिक पुरावे प्राप्त झाल्यानंतर एसआयटीनं आणखी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.

२७ एप्रिल रोजी हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रज्ज्वल रेवण्णा फरार झाला होता. त्याने देश सोडून पलायन केलं होतं. यावरून बरीच टीका झाली होती. त्यानंतर बंगळुरु पोलिसांच्या विनंतीवरुन इंटरपोलनं प्रज्वल रेवण्णाला ब्लू कॉर्नर नोटीस देखील काढली होती.

मोठी बातमी! प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक;  एसआयटी पथकाने ठोकल्या बेड्या
Supreme Court On Tenate:घर खाली न करणं पडणार महागात; भाडेकरूंच्या दादागिरीला सुप्रीम कोर्टाचा चाप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com