Supreme Court On Tenate:घर खाली न करणं पडणार महागात; भाडेकरूंच्या दादागिरीला सुप्रीम कोर्टाचा चाप

Supreme Court On Tenate: बऱ्याचवेळा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात भाडे किंवा घर खाली करताना खटके उडत असतात. या वादाची दखल थेट सर्वोच्च न्यायालयाने घेतलीय.
Supreme Court On Tenate:  घर खाली न करणं पडणार महागात; भाडेकरूंच्या दादागिरीला सुप्रीम कोर्टाचा चाप
Supreme Court On Tenate

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

भाडेकरारावरून घरमालक आणि भाडेकरूंमध्ये अनेकदा वाद निर्माण होतो. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या वादावर तोडगा काढणारा महत्वाचा निर्णय दिलाय. त्यावरचा हा खास रिपोर्ट.

करार संपला तरी घर खाली न करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात संघर्ष झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या भाडेकरूंच्या दादागिरीला चाप लावणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.

सुप्रीम कोर्टाचा भाडेकरूंच्या दादागिरीला चाप

कोर्टाने एकदा प्रकरण निकाली काढलं की भाडेकरार संपुष्टात येतो.

भाडेकरार संपल्याच्या दिवसापासून घरमालक नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार.

घरमालक भाड्यापासून वंचित राहिल्यास अपीलीय न्यायालयाने मेस्ने आदेश पारित करावा.

घरमालकाला बाजार दराने नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार असेल.

त्यामुळे करार संपल्यानंतर भाडेकरूने घर खाली केलं नाही तर घरमालक नुकसान भरपाईचा अधिकार असेल.

कोलकत्त्यात 2015 मध्ये भाडेकरू विरुद्ध घरमालकाचा भाडे करारावरून वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात गेले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमुर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने महत्वाचा निकाल दिलाय.

Supreme Court On Tenate:  घर खाली न करणं पडणार महागात; भाडेकरूंच्या दादागिरीला सुप्रीम कोर्टाचा चाप
Health Insurance : फक्त एका तासांत कॅशलेस उपचार आणि ३ तासांत डिस्चार्ज; हेल्थ इन्शुरसच्या नियमांमध्ये मोठा बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com