Azam khan News : सपा नेते आझम खान यांना १० वर्षांची शिक्षा; १४ लाखांचा दंड, काय आहे प्रकरण?

Azam khan latest update : सपा नेते आझम खान यांना मोठा झटका बसला आहे. आझम खान यांना डूंगरपूरमधील बळजबरीने जमीनीवर ताबा करणे महागात पडले आहे. आझम खान यांना कोर्टाने १० वर्षांची शिक्षा दिली आहे.
आझम खान यांना १० वर्षांची शिक्षा; १४ लाखांचा दंड, काय आहे प्रकरण?
Azam KhanSaam tv
Published On

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. याचदरम्यान समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. एमपी-एमएलए कोर्टाने सपा नेते आझम खान यांना डूंगरपूर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टात आझम खान यांना डूंगरपूरमधील जमीनीवर ताबा करणे आणि तोडफोड करण्यास दोषी मानलं गेलं आहे.

आझम खान यांनी याआधी अनेक प्रकणात दोषी सिद्ध झाले आहेत. त्यानंतर आणखी एका प्रकरणात दोषी सिद्ध झाले आहेत. आझम यांच्यावर २०१९ साली डुंगरपूरमधील वस्तीला बळजबरीने रिकामे केलं होतं. तसेच लोकांना धमकावलं होतं. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलं होतं.

आझम खान यांना १० वर्षांची शिक्षा; १४ लाखांचा दंड, काय आहे प्रकरण?
Jalgaon Crime: दुहेरी हत्याकांडाने भुसावळ शहर हादरलं! माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

आझम खान यांच्या विरोधात ६ डिसेंबर २०१६ रोजी गंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर मारहाण केल्याचाही आरोप लगावण्यात आला आहे.

आझम खान यांना १० वर्षांची शिक्षा; १४ लाखांचा दंड, काय आहे प्रकरण?
Ayodhya Poul : बांगर यांच्या घरासमोर गोळीबार झालाच नाही; ठाकरे गटाच्या नेत्या आयोध्या पौळ यांच्यावर मात्र गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

खान यांचे वकील विनोद शर्मा यांनी म्हटलं की, बळजबरीने घर रिकामे करण्याप्रकरणी एमपी एमएलए कोर्टाने आझम खान यांना दोषी मानण्यात आलं आहे. तर त्यांची पत्नी तंजीन फातिमा यांना रामपूर जिल्हा तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. मागील आठवड्यात हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. आझम खान यांना डूंगरपूरमधील जमीनीवर बळजबरीने ताबा मिळवणे आणि तोडफोड करण्यास दोषी मानलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com