Ayodhya Poul : बांगर यांच्या घरासमोर गोळीबार झालाच नाही; ठाकरे गटाच्या नेत्या आयोध्या पौळ यांच्यावर मात्र गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Ayodhya Poul On Santosh Bangar : संतोष बांगर यांच्या निवासस्थानासमोर गोळीबाराची घटना झाल्याची खोटी पोस्ट आयोध्या पौळ फेसबुकवर टाकली होती. याप्रकरणी त्यांच्यावर हिंगोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Ayodhya Poul
Ayodhya PoulSaam Digital
Published On

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आयोध्या पोळ यांना फेसबुकवर पोस्ट टाकणं चांगलंच भोवलं आहे. संतोष बांगर यांच्या निवासस्थानासमोर गोळीबाराची घटना झाल्याची खोटी पोस्ट फेसबुकवर टाकल्याप्रकरणी त्यांच्यावर हिंगोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अशा प्रकारची कोणतीही घटना झाली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आयोध्या पोळ यांच्या उडचणीत वाढ झाली आहे.

आयोध्या पोळ पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरापुढे गोळीबाराची घटना घडल्याचं म्हटलं होतं. मात्र हिंगोली पोलिसांच्या चौकशीमध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झालं आहे. आयोध्या पोळ यांनी फेसबुकवर खोटी माहिती पोस्टद्वारे प्रसारित करत जनतेच्या मनात भीती निर्माण केल्या ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान यापूर्वी देखील आयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोलीत अनेक वेळा गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे.

शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर गोळीबार झाल्याच्या चर्चा आहेत. 27 मे रोजी बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याची पोस्ट अयोध्या पौळ यांनी फेसबुकवर टाकली होती. त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र संतोष बांगर यांनी यांचं खंडन करत अशी कोणतीही घटना झाल्याच फेटाळून लावलं.

Ayodhya Poul
Maharashtra Politics 2024 : नाशिकची जागा जिव्हारी लागली, छगन भुजबळ स्वगृही परतणार का? विद्या चव्हाण म्हणाल्या...

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर वादग्रस्त विधाने आणि या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता त्यांच्या घरासमोरच एका व्यक्तीनं शिवीगाळ करत गोळीबार केला असल्याचा दावा अयोध्या पौळ यांनी केला होता. तसेच, सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं, काय खोटं? हे सांगतील का? असा सुद्धा सवाल पौळ यांनी बांगर यांना केला होता. आता पोलिसांनीच अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगतं पौळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Ayodhya Poul
Maharashtra Politics 2024 : नाशिकची जागा जिव्हारी लागली, छगन भुजबळ स्वगृही परतणार का? विद्या चव्हाण म्हणाल्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com