Vande Bharat : वंदे भारतमधून ५० लाख घेऊन उतरला, सुटकेस घेऊन प्लॅटफॉर्मवर फिरत होता, पोलिसांनी हटकलं, पुढे...

Vande Bharat : रविवारी पाटणा जंक्शनवर आरपीएफने एका व्यक्तीला अटक केलेय. त्याच्याकडील मोठ्या सुटकेसमध्ये 50 लाख रुपये रोख सापडले आहेत.
Money
Money
Published On

Vande Bharat : रेल्वे पोलिसांनी पटना जंक्शनवर एका व्यक्तीला ५० लाख रुपयांसह अटक केली आहे. हा पैसा झधारखंडची राजधानी रांचीमधील एका कोळसा व्यापाऱ्याचे असल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाने हे पैसा ताब्यात घेतले असून तपास सुरु केलाय. त्या व्यापाऱ्याला समन्स पाठवण्यात आलाय. त्या व्यापाऱ्याचं नाव पवन ठाकूर असे आहे.

रविवारी पाटणा जंक्शनवर आरपीएफने एका व्यक्तीला अटक केलेय. त्याच्याकडील मोठ्या सुटकेसमध्ये 50 लाख रुपये रोख सापडले आहेत. आरपीएफच्या म्हणण्यानुसार, रविवारी पाटणा जंक्शन येथे वंदे भारत ट्रेनमधून एक व्यक्ती लाल रंगाची मोठी सूटकेस घेऊन उतरला होता. त्यानंतर तो प्लॅटफॉर्मवर इकडून तिकडे फिरत होता. त्या व्यक्तीला पाहून संशय आला. यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तो माणूस आधी या-त्या गोष्टी सांगून टाळत होता.

Money
Mumbai Crime : पराठेवाला महिलांना टार्गेट करायचा, अश्लील व्हिडिओ पाठवायचा; ३० महिला आतापर्यंत शिकार, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

टाळाटाळ करत असल्यामुळे आरफीएफ पोलिसांना संशय बळावला. यानंतर त्याची अधिक चौकशी करण्यात आली. आरपीएफ पोलिसांनी कसून विचारणा केल्यानंतर त्याने बॅगचे रहस्य उघड केले. बॅगमध्ये ५० लाख असल्याचे सांगितलं. त्या व्यक्तीचे नाव बजरंग ठाकूर असे आहे. त्याने आपल्याजवळील बॅगेत 50 लाख रुपये असल्याचे सांगितले. हे ऐकून आधी आरपीएफ जवानांना धक्काच बसला. त्यानंतर एवढ्या मोठ्या रकमेची बाब समोर येताच, ही माहिती आयकर विभागाला देण्यात आली.

आरपीएफ पोलिसांकडून माहिती मिळताच आयकर विभागाचे पथक पाटणा रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. आयकर पथकआल्यानंतर बॅग उघडली. बॅगेत 50 लाख रुपये सापडले. आयकर विभागाच्या पथकाने बजरंग ठाकूरची कसून चौकशी केली. त्यानंतर बजरंग ठाकूरने सांगितले की, ही रक्कम झारखंडमधील कोळसा व्यापारी पवन ठाकूर यांची आहे.

बजरंग ठाकूर म्हणाला की, पवन ठाकूर माझ्यासोबत पाटणा जंक्शनवर उतरला होता. पण पवन ठाकूर अचानक कुठेतरी गायब झाला. तो कुठे गेला, याबाबत मला माहिती नाही. आयकर विभागाने कोळसा व्यावसायिक पवन ठाकूर यांना नोटीस पाठवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com