Yeshwantpur Madgaon Vande Bharat Express Saam Tv
देश विदेश

गोव्यावरून धावणार नवीन Vande Bharat Express, प्रवासादरम्यान निसर्गाचा मनमोहक नजारा पाहायला मिळणार; थांबे किती? वाचा वेळापत्रक

Yeshwantpur Madgaon Vande Bharat Express: गोव्यावरून नवीन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ही ट्रेन गोव्याच्या मडगाव ते बंगळुरूच्या यशवंतपूरदरम्यान धावणार आहे. वाचा या ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक.

Priya More

भारताला आणखी एक वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ही ट्रेन गोवा ते बंगळुरूदरम्यान धावणार आहे. बंगळुरूमधील यशवंतपूर आणि गोव्यातील मडगावदरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ही ट्रेन प्रवाशांना भारतातील सर्वात सुंदर रेल्वे मार्गांपैकी एका मार्गावरून प्रवास करण्याची संधी देणार आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना निसर्गाचा मनमोहक नजारा पाहायला मिळणार आहे. प्रवाशांना पश्चिम घाट आणि किनारपट्टीवरील कर्नाटकच्या सुंदर निसर्गदृश्यांचा अनुभव घेता येणार आहे.

भारतीय रेल्वे लवकरच बंगळुरू आणि गोवा दरम्यान नवीन यशवंतपूर-मडगाव वंदे भारत ट्रेन सुरू करणार आहे. ही गाडी आव्हानात्मक ५५ किलोमीटरच्या सकलेशपूर-सुब्रह्मण्य रोड घाट मार्गावरून धावणार आहे. या सेमी-हाय-स्पीड ट्रेनला या मार्गावर प्राधान्य देण्यासाठी रेल्वेने सध्याच्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत. ही ट्रेन सकलेशपूरपासून सुब्रह्मण्य रोडवरून जाईल. या प्रवासादरम्यान प्रवाशांना हिरवेगार पर्वतरांगा, खोल धुक्याच्या दऱ्या आणि धबधब्यांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळेल. ही ट्रेन उडुपी आणि गोकर्णासारख्या पर्यटन स्थळांवरून देखील जाईल.

बंगळूरु आणि गोवा दरम्यानच्या ६७० किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन १२ प्रमुख स्थानकांवर थांबेल. ही ट्रेन एकूण ६७० किमी अंतर कापेल आणि आठवड्यातून ६ दिवस दोन्ही दिशांनी धावेल. ही ट्रेन यशवंतपूरहून सकाळी ७:३५ वाजता सुटेल आणि रात्री ८:५५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासादरम्यान ही ट्रेन मडगावहून सकाळी ८:२० वाजता सुटेल आणि रात्री ९:१५ वाजता यशवंतपूरला पोहोचेल. या प्रवासादरम्यान, ही ट्रेन श्रवणबेळगोळा, हसन, सकलेशपूर, उडुपी, मुरुडेश्वर, गोकर्ण रोड आणि कारवार यासह एकूण १२ प्रमुख स्थानकांवर थांबेल. या वंदे भारत ट्रेनमधून दररोज जवळपास १,१०० प्रवासी प्रवास करतील.

यशवंतपूर-मडगाव वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक -

यशवंतपूर ते मडगाव वंदे भारत (ट्रेन क्र. २६६५५)

यशवंतपूरहून सुटण्याची वेळ: सकाळी ७:३५ वाजता

गोव्यातील मडगावला पोहचण्याची वेळी: रात्री ८:५५ वाजता

प्रवासाची वेळ: सुमारे १३ तास ​​आणि २० मिनिटे

दिवस: बुधवार वगळता सर्व ६ दिवस धावेल

मडगाव ते यशवंतपूर (ट्रेन क्रमांक २६६५६)

मडगावहून सुटण्याची वेळ: सकाळी ८:२० वाजता

यशवंतपूरला पोहचण्याची वेळी: रात्री ९:१५ वाजता

प्रवासाची एकूण वेळ: सुमारे १२ तास ५५ मिनिटे

दिवस: गुरुवार वगळता आठवड्याचे सर्व ६ दिवस धावतील

ही १२ स्थानके असतील -

1. श्रवणबेळगोला (तीर्थक्षेत्र)

2. हसन

3. सकलेशपूर (सर्वात सुंदर हिल स्टेशन)

4. सुब्रह्मण्य रोड (कुक्के सुब्रह्मण्य मंदिर)

5. कबाका पुत्तूर

6. मंगळुरु जंक्शन (कर्नाटक किनारपट्टी)

7. उडुपी (प्रसिद्ध मंदिरे)

10. मुरुडेश्वर (जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिवमूर्ती)

11. गोकर्ण रोड (महाबळेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध)

12. कारवार (शांत आणि सुंदर समुद्रकिनारी असलेले शहर)

देशातील सर्वात धीम्या गतीची वंदे भारत ट्रेन -

ही वंदे भारत ट्रेन देशातील सर्वात कमी वेगाच्या वंदे भारत ट्रेनपैकी एक असेल. ही ट्रेन डोंगर आणि नागमोडी दऱ्यांमधून ताशी ५३ ते ५४ किलोमीटर वेगाने प्रवास करेल. डोंगराळ प्रदेश आणि अवघड रेल्वेमार्गांमुळे ट्रेनचा वेग नियंत्रित ठेवला जाईल. या कमी वेगामुळे पर्यटकांना घाट आणि दऱ्यांच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल. यशवंतपूर-मडगाव ट्रेनमुळे गोकर्ण, उडुपी, मुर्देश्वर आणि कारवारला प्रवास करणाऱ्या पर्यटकांना सर्वात जास्त फायदा होईल. या ट्रेनचे डबे बंगळूरच्या बीईएमएल कंपनीने चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधील तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आहेत. रेल्वेकडून लवकरच ही ट्रेन कधीपासून धावणार याची तारीख जाहीर केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपूरात ऊस दराच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांचा एल्गार

हात-पायांना मुंग्या का येतात? यामागचं कारण काय?

Mumbai : मुंबईत कचरा टाकणाऱ्यांवर आता AI कॅमेऱ्यांची नजर! नियम मोडल्यास भरावा लागणार दंड

Sleep Stroke Symptoms : झोपेत असताना स्ट्रोक का येतो? 'ही' लक्षणं दिसली तर गाफील राहू नका अन्यथा...

कोरड्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशीच मृत्यूला कवटाळले

SCROLL FOR NEXT