Sakshi Sunil Jadhav
गुरू चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचा मार्ग दाखवणारे तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या मते काही आर्थिक व्यवहाराबद्दल इतरांना सांगितल्याने भविष्यात तुमचं नुकसान होऊ शकतं.
आपण किती पगार कमावतो, याची माहिती सर्वांना सांगू नका; कारण त्यामुळे इतरांशी तुलना, मत्सर किंवा अनावश्यक अपेक्षा निर्माण होऊ शकतात.
तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत, याची माहिती प्रत्येकाला देऊ नका; बचतीची माहिती मिळाल्यानंतर काही लोक पैशांची मागणी करू शकतात.
आयुष्यभराच्या मेहनतीतून जमा केलेली बचत सुरक्षित ठेवा आणि तिची माहिती फक्त विश्वासू व्यक्तींनाच द्या.
घर, कार किंवा इतर कारणांसाठी घेतलेले कर्ज, दरमहा भरणारा EMI आणि उर्वरित कर्जाची माहिती अनावश्यकपणे इतरांना सांगू नका.
कंपनीकडून मिळालेला बोनस, गुंतवणुकीतून झालेला नफा किंवा अतिरिक्त उत्पन्न याची माहिती सर्वांसमोर सांगणे टाळा.
नवीन घर खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही.
अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात; त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतः संशोधन करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.